Satara NCP News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भलताच उत्साह; नेत्याच्या मंत्रिपदासाठी घातले दगडूशेठ गणपतीला साकडे...

Makrand Patil : मकरंद पाटील यांनी सलग तीनवेळा आमदारकी मिळवली असून खंडाळा व किसन वीर हे दोन साखर कारखानेही सुरळीतपणे सुरु ठेवले आहेत.
MLA Makrand Patil
MLA Makrand Patilsarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News : अजित पवार गट राष्ट्रवादीचे वाई, खंडाळा, महाबळेश्वरचेआमदार मकरंद पाटील यांनी सलग तीनवेळा आमदारकी मिळवली आहे. त्यामुळे नवीन वर्षात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मकरंद पाटलांना मंत्रिपद मिळावे यासाठी खंडाळा राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक घालून साकडे घातले आहे.

आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी महाबळेश्वरच्या घनदाट खोर्‍यापासून ते लोणंदपर्यंतच्या सर्व गावात आपला जनसंपर्क ठेवला आहे. विविध मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. तसेच खंडाळा व किसन वीर Kisan veer sugarfactory दोन साखर कारखानेही ताब्यात घेऊन ते सुरळीतपणे सुरू ठेवले आहेत.

वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा कारभार सांभाळणाऱ्या मकरंद आबांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे, या मागणीसाठी खंडाळा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले आहे शिवाय अभिषेकही करण्यात आला.

यावेळी प्रवीण खंडागळे यांच्या समवेत श्रीनाथ यादव, माऊली जगताप, प्रशांत भोसले, विशाल गारडे, अशोक ननावरे, प्रतीक सस्ते, किरण गाढवे, गौरव फाळके, प्रतीक खंडागळे, प्रथमेश खंडागळे असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

MLA Makrand Patil
Grandma Found Her Way Back : लेकीकडे निघालेली आजी वाट चुकली, अन् कन्याकुमारीला पोहोचली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com