Wai : किसन वीर मधील हुकुमशाही हद्दपार; घामाचा पैसा त्यांच्याकडून वसूल करणार...

किसन वीर Kisan veer, खंडाळा Khandala Sugar factory दोन्ही कारखान्यांचे मिळून १२ लाख मेट्रिक टन 12 Lakh Metric Tone उस गाळपाचे उद्दिष्ठ असून, त्याप्रमाणात यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
Kisan Veer sugar Factory Sabha
Kisan Veer sugar Factory Sabhasarkarnama
Published on
Updated on

कवठे : किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू होणार असून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देऊन कामगारांचे पगारही वेळेवर केले जातील. परंतू ज्यांनी शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा बुडवला त्यांच्याकडून तो वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. किसन वीर व खंडाळा कारखान्यात सत्तांतर करीत शेतकरी सभासदांनी हुकुमशाहीला बाहेर काढून, दोन्ही कारखान्यात लोकशाही पुर्नस्थापित केली, असे मत किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष व वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.

किसन वीर कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, नितीन भुरगुडे पाटील आदी उपस्थित होते.

Kisan Veer sugar Factory Sabha
'किसन वीर'चा यावर्षीचा हंगाम यशस्वी करणार... मकरंद पाटील

आमदार मकरंद पाटील म्हणाले, किसन वीर आबांनी पाच तालुक्यातील सहकाऱ्यांना घेवून उभारलेल्या कारखान्यात आता लोकशाही आल्याने ही सभा निर्भीड व आनंदी वातावरणात होत आहे. गत एकोणीस वर्षातील हुकमशाही व अनागोंदी कारभारामुळे कारखाना अडचणीत येवून कारखान्यावर प्रचंड कर्जाचा बोजा वाढवला. त्यामुळे हजारो एकर उस असूनही, कारखाना बंद ठेवला.

Kisan Veer sugar Factory Sabha
Satara : ग्रेडसेपरेटर निरूपयोगी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव वाटते... खासदार उदयनराजे

मागील वर्षांचे शेतकऱ्यांचे पैसे न देता गाळप सुरू केले. अठ्ठावीस दिवसांपैकी १४ दिवसच गाळप केले. त्यामुळे कारखान्यावर १८ कोटींने तोटा वाढला. शेतकरी, कामगार यांचे होणारे नुकसान, आर्थिक कुचंबना, मनस्ताप विचारात घेवून, ज्या जनतेने आपल्याला तीनवेळा आमदार केले त्यांना यातून बाहेर काढण्यासाठीच आपण आपल्या कर्तव्यापासून पळ न काढता लोकाग्रहस्तव दोन्ही कारखान्यांची निवडणूक लढवून जिंकली.

Kisan Veer sugar Factory Sabha
Wai : मदन भोसलेंसह त्यांच्या पै पाहुण्यांनी 'किसन वीर' खाल्ला....नितीन पाटील

परंतू या कारखान्यांची अतिशय भयानक अवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणतीही बँक पैसे देणार नसल्याने, लोकांच्यातून भाग भांडवल वाढविण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देवून हातभार लावला. त्यामुळे दोन्ही कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू करणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, कारखान्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी व कामगारांचे प्रचंड हाल व मनस्ताप पाहून, तसेच समाजकारण व राजकारण हे सर्वसामान्यांसाठीच करावयाचे या निर्धारानेच निवडणूक लढवली.

Kisan Veer sugar Factory Sabha
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

त्यात सभासदांनी आम्हा सर्वांवर विश्वास दाखवून निवडून दिले. अर्थिक गर्तेस सापडलेल्या कारखान्याचा लिलावापासून वाचविण्यासाठी सभासदांना भाग भांडवल वाढविण्यासाठी केलेल्या आवाहनाला, चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस तोड व वाहन मालकांना आपण पैसे देवू शकलो. दोन्ही कारखान्यातील अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत. या हंगामात दोन्ही कारखान्यांचे मिळून १२ लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ठ असून, त्याप्रमाणात यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com