
Sangli News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 2022 पूर्वीची स्थिती कायम ठेवण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षापासून प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ता ताब्यात घेण्याचे टार्गेट महायुतीचे असणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महायुतीने पाच जागा पटकावत आपली ताकद दाखवून दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत असेच यश महायुतीला मिळाले होते. त्यावेळी भाजपने चार आणि शिवसेनेने एक जागा जिंकली होती. त्याची पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत सत्ता आणणे हेच महायुतीचे लक्ष्य असणार आहे. पण सध्या अजित पवार गटाची वाढलेली ताकद जिल्ह्यासह भाजपमध्ये चर्चेचा विषय आहे.
पण सध्याची जिल्ह्यात झालेले राजकीय बदल आणि राजकीय प्रवेश यामुळे भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सुसाट आहे. भाजप शहरातून बाहेर पडत गाव पातळीपर्यंत सदस्य नोंदणी करत आहेत. आतातर मंडल अध्यक्ष करत बुथ देखील मजबूत केले जातायत. यामुळे भाजपला तोंडावर आलेल्या स्थानिकची अधिकची चिंता नाही.
मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गनिमी कावा करत भाजपसह अनेकांना धक्का दिला. त्यांनी मिरज येथील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये याची रणनीती आखली आणि प्रवेश घडवून आणला. यात शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा समावेश आहे.
कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे याआधी विधानसभेवेळी अजित पवार यांच्याकडे गेले होते. पण नंतर त्यांनी पक्ष प्रवेश असो किंवा इतर कामासाठी अजित पवार यांची भेट घेतलेली नाही. यामुळे ते अजित पवार यांच्याबरोबर आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधी येथे ताकद होती. त्यावेळी जिपला 10 ते 12 जागा मिळत होत्या. पण आता शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा स्वतंत्र गट असल्याने येथे झेडपीला किमान 6 जागा येण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत 60 जागा असणाऱ्या सांगली जिपमध्ये भाजप सत्तेत होती. यामध्ये भाजपच्या सुमारे 25 होत्या. शिवसेना अनिल बाबर गटाच्या 2 जागा, शेतकरी संघटना 3 ते 4 अशा मिळून सत्ता आली होती. पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीचा फायदा भाजपला कमी राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी संघटनेकडे असणाऱ्या जागाही राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. पण असे असले तरीही निशिकांत पाटील म्हणजे सर्वकाही नाही असेच चित्र सध्या जिल्ह्यात आहे. कारण महायुती म्हणून जयंत पाटलांच्या विरोधात भाजपने त्यांना ताकद दिल्यानेच ते जयंतरावांशी दोन हात करू शकले होते. पण आता तेच भाजपसोबत नसल्याने याचा आगामी जिपच्या निवडणुकीत परिणाम जाणवरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.