Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आली ‘मिशन मोड’वर

Lok Sabha Election 2024 : अन्य पक्षांची मात्र ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका
BJP & NCP For Lok Sabha Election.
BJP & NCP For Lok Sabha Election.Sarkarnama
Published on
Updated on

Gondia Politics : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात भाजपकडून ‘मिशन मोड’वर काम सुरू आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गट सध्या ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. तिरोडा, आमगाव-देवरी आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघांत काँग्रेस सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

नुकत्याच 16 डिसेंबरला भाजपच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर भाजपकडून गोंदिया जिल्हाभरात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र सध्या भाजपकडे आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तो कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

BJP & NCP For Lok Sabha Election.
Gondia News : जुन्या वादातून ग्रामपंचायत कार्यालयातच तुफान हाणामारी; पोलिसांत गुन्हा दाखल

अन्य पक्षांकडून लोकसभेसाठी सध्या सुमार तयारी केली जात आहे. काँग्रेसने लोकसभेच्या अनुषंगाने सभा, बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. लोकसभेसाठी नेमका कोणता उमेदवार देणार, हे अद्याप गुपित आहे. उमेदवारीवरून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फूट पडू नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात असल्याचे काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने ‘सरकारनामा’ सांगितले. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी लोकसभा निवडणुकीऐवजी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने गोंदिया जिल्ह्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली, पण उमेदवार कोण राहणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजप पुन्हा विद्यमान खासदारांना संधी देणार की, नवीन चेहरा देणार याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपकड़ून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. विदर्भ संघटन प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी आढावा घेतल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीवर काही नावांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्ह्यात सभा, मेळावे, बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. शरद पवार गटाकडून सध्या कुठलीही तयारी सुरू झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिरोडा व अर्जुनी मोरगाव या दोन विधानसभा मतदार संघावर दावा केला जात आहे. या गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सूतोवाच केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातर्फे मागील दोन ते तीन महिन्यांपासून जनसंपर्कावर भर देण्यात येत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. हा सर्व राजकीय खटाटोप बघता भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस जोमात व इतर पक्ष कोमात असेच चित्र सद्धा आहे.

Edited by : Prasannaa Jakate

BJP & NCP For Lok Sabha Election.
Gondia : शेतकऱ्यांवर अस्मानी, सुलतानी आणि हत्तींचंही संकट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com