Municipal Elections : कोल्हापुरात राजकारण फिरलं; महायुती फुटणार, महाविकास आघाडीलाही तडे?

Mahayuti and Mahavikas Aghadi Internal Conflicts in Kolhapur : काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आघाडी करत पालिकेवर सत्ता मिळवली होती. त्याला शिवसेनेकडून बळ मिळाले.
BJP  NCP Shivsena Congress
BJP NCP Shivsena Congress Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची वेळ या सर्वच पक्षांवर येणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या दोन आघाड्यानी रणांगण गाजवले असले तरी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तीच परिस्थिती महाविकास आघाडीत देखील आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच पक्षांपुढे इच्छुकांचे समजूत घालणे हे आव्हान असणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात मागील वेळी काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आघाडी करत पालिकेवर सत्ता मिळवली. त्याला शिवसेनेकडून बळ मिळाले. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी कोल्हापुरात महाविकास आघाडीची पायाभरणी झाली असे म्हणावे लागेल.

मात्र अडीच वर्षाचे राजकारण पाहता हसन मुश्रीफ हे महायुतीत गेल्याने आगामी महापालिका निवडणुका या महायुती सोबत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत देखील महापालिकेत मित्र असलेले एकमेकांच्या विरोधात आघाडीत सक्रिय होते. सध्याची परिस्थिती पाहता गेल्या साडेचार वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहे.

BJP  NCP Shivsena Congress
Kolhapur Politics : मंत्रिपदाचा सस्पेन्स कायम..., कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे

काँग्रेस नेते सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्याकडून गेले दहा वर्ष कोल्हापूर महापालिकेवर सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. मात्र मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर हे सध्या एकत्र आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचे संख्याबळ पाहता सध्याच्या घडीला काँग्रेस नगरसेवकांची संख्या ३० इतकी आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 14 वर आहे. ताराराणी आघाडी 19 तर भाजप 14 शिवसेना 4 असे संख्याबळ आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आव्हान

मागील विधानसभेच्या निकालाचे गणित पाहता जिल्ह्यात चार आमदार काँग्रेसचे असल्याने काँग्रेसला पूरक परिस्थिती निर्माण झाली होती. पण सध्याचे विधानसभेचे गणित पाहता भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेची हवा आहे. तर महायुतीमधील राष्ट्रवादीची देखील ताकद अधिक आहे. केवळ काँग्रेस, भाजप, एकनाथशिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रभाव महापालिकेचा निवडणुकीत जास्त पडण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष केवळ नावापुरताच शिल्लक आहे अशी परिस्थिती आहे.

नाराजांमुळे स्वबळावर?

एकंदरीत पाहता सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने प्रत्येकाची नाराजी काढणे हे महायुती आणि महाविकास आघाडी पुढे आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढून निवडून येणाऱ्या संख्याबळावरच महायुतीचे गणित पुन्हा जुळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

BJP  NCP Shivsena Congress
Mahayuti News : शपथविधीनंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यासाठी मोठी रस्सीखेच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com