Kolhapur Politics : मंत्रिपदाचा सस्पेन्स कायम..., कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे

Kolhapur Leaders Competing for Mahayuti Ministerial Positions : कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव निश्चित समजले जातं आहे. तर भाजपकडून अमल महाडिक किंवा जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आणि विनय कोरे यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नावे चर्चेत आहे.
Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar, Vinay Kore, Amal Mahadik, Hasan Mushrif
Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar, Vinay Kore, Amal Mahadik, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 06 Dec : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागले आहेत. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती आणि राजर्षी शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये 11 डिसेंबरपर्यंत सस्पेन्स कायम राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीतील पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याबाबतची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. तर आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळणार का यासाठी कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागलेले कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहेत.

Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar, Vinay Kore, Amal Mahadik, Hasan Mushrif
Mahayuti News : शपथविधीनंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यासाठी मोठी रस्सीखेच

11 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हा सस्पेन्स 11 तारखेलाच संपणार आहे. गुरूवारी शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीमधील तीन नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पदांचे निकष ठरवण्यात आले आहेत.

काही पदांचा मार्ग मोकळा झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसात या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव निश्चित समजले जाते. तर भाजपकडून आमदार अमल महाडिक किंवा जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar, Vinay Kore, Amal Mahadik, Hasan Mushrif
Devendra Fadnavis : 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी...'; ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शपथविधीनंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मी त्याचवेळी..."

तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे नाव चर्चेत आहे. मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्यास कार्यकर्त्यांना शपथविधीसाठी निमंत्रण केले जाणार आहे. मुळे त्या निरोपाची वाट असंख्य कार्यकर्ते पाहत आहेत. पण त्यांच्याकडूनही थेट उत्तर मिळत नसल्याने या कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com