Kolhapur News, 10 Oct : उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (ता.09) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेवरून विरोधकांना चांगलंच सुनावलं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Kolhapur District Central Bank) नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी बँकेला नफ्यात आणल्याचं सांगितलं.
यावेळी अजितदादांनी म्हणाले, "राजकीय द्वेष मनात ठेवून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला बदनाम केलं होतं. पण तीच बँक आता 670 कोटीच्या नफ्यात पोहोचली आहे. अशा प्रवृत्तीमुळेच सामान्य माणसाचे नुकसान झालं आहे."
कोल्हापूर सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) होते. अजित पवार म्हणाले, "ग्रामीण भागातील नागरिकांची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचे काम जिल्ह्यातील विकास संस्था, जिल्हा बँका आणि सहकारी बँका करत असतात.
महाराष्ट्र राज्य बँकेला विरोधकांनी राजकारणातून बदनाम करण्याचे काम केल्याने त्याचा फटका सगळ्यांनाच बसला. मात्र, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या एकाच घावात दोन तुकडे अशा काम करण्याच्या पद्धतीमुळे बरेचसे प्रश्न सुटले.
साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दिलेल्या दरावर आकारण्यात येणारा कर रद्द करण्यासाठी 'यूपीए'च्या काळात तत्कालीन अर्थमंत्र्यांना भेटलो. पण काही उपयोग झाला नाही. पण, केंद्रीय मंत्री शाह यांनी हा प्रश्न तात्काळ निकालात काढल्याचंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.