Sangli NCP Politics : राष्ट्रवादीच्या दुफळीने ओलांडले घरांचे उंबरठे; सांगलीत 'या' पिता-पुत्रांची विरोधात भूमिका

Ajit Pawar Vs Sharad Pawar : जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यावर अजित पवार जाळे टाकण्याच्या तयारीत
Ajit Pawar, Sharad Pawar, Jayant Patil
Ajit Pawar, Sharad Pawar, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Sangli Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार गट अशी पक्षाची विभागणी झाली. याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सांगली जिल्ह्याही अपवाद नाही. पक्षातील हे दोन गट आता नेत्यांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. या फुटीने अनके घरांचे उंबरेही ओलांडल्याची उदाहरणे आहेत. यातूनच सांगली जिल्ह्यातील दोन पुत्रांची वाटचाल ही आपल्या पित्यांच्या विरोधात झाली आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे सांगली जिल्ह्यातील आहेत. आत्तापर्यंत राष्ट्रवादीची मोट जयंत पाटील यांनी चांगल्या पद्धतीने बांधली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबत ठेवण्यात ते सध्या तरी यशस्वी होते; पण राष्ट्रवादी फुटली तशी जिल्ह्याजिल्ह्यांत दोन गट तयार झाले. त्याची झळ सांगलीतील राजकीय कुटुंबालाही बसली आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बरांना, माजी मंत्री असलेल्यांना या फुटीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Jayant Patil
Supriya Sule Baramati : बारामतीत राष्ट्रवादी-भाजप सक्रिय; इंदापुरात सुळे तर खडकवासल्यात अंकिता पाटील मैदानात

विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत आहेत. सध्या सदाशिव पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ते शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे बोलले जाते, पण त्यांचे पुत्र विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत आहेत. त्यांनी नुकतीच अजितदादांची भेट घेतलेली आहे. दुष्काळाबाबत भेट घेऊन त्यांनी अनेक मागण्या आणि तुमच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले आहे. वैभव पाटील हे त्यांचे वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांचे बऱ्यापैकी काम पाहत असतात. पण या दोन भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (Maharashtra Political News)

दुसरीकडे इस्लामपूरमध्ये विट्याच्या उलट चित्र आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे आहेत. त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांचे इस्लामपूर येथे स्वागत केले. मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे स्वागतासाठी गेलो, अशी डांगेंनी त्यावेळी स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, शिराळा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार सम्राट महाडिक यांचा भावी आमदार म्हणूनही त्यांनी उल्लेख केला आहे. परिणामी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे अजित पवार किंवा भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

या वातावरणात मात्र डांगेंचे चिरंजीव चिमण डांगे हे इस्लामपूरचे नगराध्यक्ष आहेत. ते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या सोबतच म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहतील असा अंदाज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकीय घराण्यावरही झालेला दिसून येतो. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Sharad Pawar, Jayant Patil
Bhanudas Murkute Ahmednagar : भानुदास मुरकुटे आजी-माजी मंत्र्यांवर बरसले; म्हणाले, 'सत्तेसाठी विखे-थोरातांची...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com