Pune Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप बारामतीत सक्रिय झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील गणेश मंडळांशी संवाद साधला, तर दुसरीकडे भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी खडकवासला येथे गणपतीच्या आरतीला हजेरी लावली. बारामतीच्या दोन्ही टोकांवरील विधानसभेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याने राष्ट्रवादी-भाजपने लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)
बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघामध्ये सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप व भाजपपुरस्कृत उमेदवारांचा पराभव केला आहे. यातून २०२४ ची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीमुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने मिशन बारामती काही महिन्यांपूर्वीच सुरू केले आहे, तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी इंदापूर तालुक्यामध्ये सायंकाळी गणपतीच्या आरतीला सुरुवात केली. इंदापूर शहरातील २२ पेक्षा अधिक गणपतीच्या मंडळाला भेटी दिल्या. तसेच भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरेंनीही बावधनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह गणपतीची आरती केली. (Maharashtra Political News)
यानंतर अंकिता पाटील (Ankita Patil) यांनीही खडकवासला मतदारसंघातील सुमारे दहा गणेश मंडळांना भेटी दिल्या. यासह बारामतीतील डोर्लेवाडी व माळेगाव येथीलही गणेश मंडळांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस व अंकिता पाटील यांच्या हजेरीमुळे बारामती लोकसभेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे गणपती राष्ट्रवादीला की भाजपला पावणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सुप्रिया सुळे - अंकिता पाटील समोरासमोर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सुधीर पाटसकर यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. पाटसकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रविवारी पाटसकर यांच्या गेल्या घरी होत्या. या वेळी भाजपच्या अंकिता पाटीलही पाटसकरांच्या भेटीसाठी तेथे आल्या होत्या. दोघीही काही वेळ समोरासमोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एकमेकींना स्मितहास्य करून त्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या.
(Edited By Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.