Chandrakant Patil News : 'राष्ट्रवादी'च्या चिन्हाचा निर्णय चंद्रकांतदादांनीच केला जाहीर; अजितदादांनाही सूचना दिल्याचा दावा

Chandrakant Patil Announcement : शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी काही तास उरले असतानाच येथील राजकारणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील हालचालींनी गती घेतली आहे.
Chandrakant Patil & Ajit Pawar
Chandrakant Patil & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra elections : शिराळा तालुक्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम आघाडी आता जत नगरपंचायतीत झाली आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांत या आघाडीने निर्माण केलेल्या नवीन समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा झाली असली, तरी कोणत्या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे, याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप जाहीर केले नाही.

जतमधील घडामोडींनंतर शिराळ्यातही ‘घड्याळ’ चिन्हावरच उमेदवार उभा राहण्याची शक्यता बळावली आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी शिराळा आणि जतमध्ये एकत्रित आल्या असल्या, तरी ते तुतारी अथवा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ईश्वरपूर येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिवाय तशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे सांगितले आहे.

शिराळ्यात राष्ट्रवादीचे चिन्ह काय? की घड्याळच, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी काही तास उरले असतानाच येथील राजकारणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील हालचालींनी गती घेतली आहे. महायुतीने शिवसेनेच्या पृथ्वीसिंग नाईक यांची उमेदवारी जाहीर करून प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे.

Chandrakant Patil & Ajit Pawar
Gopichand Padalkar News : गोपीचंद पडळकरांना झटका; आटपाडीत झाला 'करेक्ट कार्यक्रम'

राष्ट्रवादीची आघाडी जाहीर करताना स्थानिक नेत्यांनी विकासाचा अजेंडा पुढे ठेवला असून, राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून स्थिर आणि सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार केला आहे. मात्र या सर्व घोषणांमध्ये एक मुद्दा जाणूनबुजून ‘प्रलंबित’ ठेवण्यात आला आहे, तो म्हणजे चिन्हाचा. अंतिम घोषणेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

निर्णय काहीही असो, मात्र शिराळ्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची पहिली आघाडी ही स्थानिक समीकरणांना मोठी कलाटणी देणारी ठरणार आहे. त्याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी महायुतीच्या सर्व यंत्रणा सतर्क करून त्या पद्धतीने राजकीय चाली सुरू केल्या आहेत.

Chandrakant Patil & Ajit Pawar
Uddhav Thackeray News : शिंदेसेनेच्या विरोधानंतरही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाच दिला 'तो' मान; निवडणुकीच्या तोंडावर निर्णय...

त्याचाच एक भाग म्हणून महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांच्या प्रचारात त्यांचे विरोधक असणारे सासरे विश्वास कारखान्याचे संचालक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे समर्थक विश्वास कदम यांना प्रचार यंत्रणेत सहभागी करून घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com