Hasan Mushrif : विधानसभेला बहुरंगी लढतीचे भाकित करणाऱ्या मुश्रीफांचा महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा

Mahayuti CM Post : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बहुरंगी लढती होणे अटळ आहे. कारण कोणताच राजकीय पक्ष थांबायला तयार नाही. त्याही परिस्थितीमध्ये राज्यात महायुती 165 जागा जिंकून सर्वात मोठी आघाडी बनेल.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 26 July : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज (ता. २६ जुलै) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सकाळी ते पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या संदर्भाने भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती पहायला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमधूनच निवडणूक लढवेल. तसेच, मुख्यमंत्रिपदाबाबत निवडणुकीनंतर ठरवू, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनानंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी विधानसभा निवडणूक (Assembly Election), मुख्यमंत्रिपद, तिसरी आघाडी आणि अनिल देशमुख आदी प्रकरणांवर भाष्य केले आहे.

‘आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बहुरंगी लढती होणे अटळ आहे. कारण कोणताच राजकीय पक्ष थांबायला तयार नाही. त्याही परिस्थितीमध्ये राज्यात महायुती 165 जागा जिंकून सर्वात मोठी आघाडी बनेल,’ असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राज्यातील संभाव्य तिसरी आघाडीवर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात तिसरी आघाडी वगैरे काही होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. महायुतीची सत्ता आणणं सर्वांत महत्वाचं आहे. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे ठरवू. राज्यात महायुतीच्या 165 जागा निश्चितपणे निवडून येतील, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

Hasan Mushrif
Abhijeet Patil Meet Fadnavis : लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू; फडणवीसांचा अभिजित पाटलांना शब्द

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिळ्या कढीला ऊत आणू नये. त्याचवेळी त्यांनी एफआर दाखल करायला पाहिजे होता. माझ्याकडे त्यांच्या अनेक गोष्टी आहेत. योग्य वेळी त्या सांगेन, असा गौप्यस्फोटही हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

Hasan Mushrif
Mahayuti Vs Maha Aghadi : ‘फडणवीसांच्या बदनामीसाठी महाआघाडीने केंद्र उभारले; श्याम मानवांनी त्याचे उद्‌घाटन केले’

मनोज जरांंगे पाटील हे भाजप नेत्यांवर वारंवार टीका करत आहेत. त्यांचा काय उद्देश काय आहे, हे अजूनही समजत नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com