Anjali Damania : दमानियांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याने हात जोडले; तर युवक अध्यक्ष म्हणतात, ‘मी त्यांच्यावर बोलणार नाही’

Aditi Tatkare-Suraj Chavan : निवडणुकीच्या तोंडावर बोलून मी अंजली दमानिया यांचं महत्त्व वाढवणार नाही. कारण, माझ्या राजकीय गुरूंनी सांगितले आहे की चिखलात दगड मारायचा नाही, त्यामुळे आपलेच कपडे खराब होतात
Anjali Damania-Aditi Tatkare-Suraj Chavan
Anjali Damania-Aditi Tatkare-Suraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 September : अंजली दमानिया या कुणाच्या तरी सांगण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अजेंडा चालवत असाव्यात. पण, निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर बोलून मी अंजली दमानिया यांचं महत्त्व वाढवणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अंजली दमानियांच्या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी हात जोडून बोलण्यास नकार दिला.

मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि सूरज चव्हाण (Suraj Chavan) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्या वेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी पुन्हा एकदा दमानिया यांच्यावर टीका केली. चव्हाण म्हणाले, अंजली दमानिया यांच्या आरोपावर मी आत्ताच बोलणार नाही. कारण, निवडणुकीच्या तोंडावर आरोप करणारे असे अनेक भेटतात.

निवडणुकीच्या तोंडावर बोलून मी अंजली दमानिया (Anjali Damania) यांचं महत्त्व वाढवणार नाही. कारण, माझ्या राजकीय गुरूंनी सांगितले आहे की चिखलात दगड मारायचा नाही, त्यामुळे आपलेच कपडे खराब होतात, असेही सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अंजली दमानियांच्या प्रश्नावर अदिती तटकरेंनी हात जोडून बोलण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून महायुतीत सुरू असलेल्या कुजबुजीवरही सूरज चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी जाहिरात दिली आहे, त्यात तीनही नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, पक्षा संदर्भात जेव्हा प्रचार करण्यात येतो, त्यावेळी वेगवेगळा प्रचार केला जातो.

Anjali Damania-Aditi Tatkare-Suraj Chavan
Raksha Khadse Politics: "एकनाथ खडसेंमुळेच मी जिंकले"... रक्षा खडसेंचा मॅसेज भाजपच्या कोणत्या नेत्याला?

विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही. लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे महायुतीमध्ये भांडण लागावं, यासाठी विरोधकांमध्ये चाललेले हे षडयंत्र आहे. महायुतीमध्ये समन्वय आहे. एकमेकाबद्दल द्वेष असण्याचं कारण नाही, असेही सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सूरज चव्हाण म्हणाले, मराठवाडा येथील झालेल्या नुकसानाची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. तातडीने पंचनामा करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. धनंजय मुंडे यांनीही पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी कदाचित जुन्या कृषिमंत्र्यांचे व्हिडिओ पाहिले असतील. टीका करत असताना आदित्य ठाकरे यांनी आधी माहिती घ्यावी, त्यानंतरच टीका करावी.

Anjali Damania-Aditi Tatkare-Suraj Chavan
Jaydeep Apte Arrest : आपटेच्या अटकेआधीच जामिनाची तयारी; सगळे आदेश ठाण्यातून, राऊतांचा गंभीर आरोप

आदित्य ठाकरे सारखं पिकनिक करायला मुंडे हे मराठवाड्यात आले नव्हते, ते मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. धनंजय मुंडे यांना कोणत्या शेतात कोणते पीक आहे ते माहिती आहे का. आदित्य ठाकरेंसारखं त्यांना भुईमुगाच्या शेंगा खाली असतात का वर असतात, हे पाहण्याची मुंडेंवर वाईट परिस्थिती नाही, असा टोलाही सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेला लगावला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com