Ncp News : राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी!

Prashant Babar : सोलापूर जिल्हाध्यक्षांची कारवाई...
Prashant Babar Ncp News
Prashant Babar Ncp Newssarkarnama

Ncp News : सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पेटलेल्या वाद उफाळून आला होता. आमदार प्रणिती शिंदे यांनी 'कोण रोहित पवार?' असे म्हणत त्यांनी आमदार रोहित पवार यांना डिवचले होते. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आता प्रतिक्रिया देताना संयम न राखल्याने, राष्ट्रवादीच्या युवक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष प्रशांत बाबकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बाबर याच्यावर पक्षाने दिलेल्या पदाचा मान न राखल्याबद्दल व तसेच वरिष्ठ नेत्यांबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल बाबर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मिडीया पेजवर चुकीचे अपशब्द, बदनामी कारक विधान पोस्ट केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Prashant Babar Ncp News
Karnataka Assembly Election : राष्ट्रवादीचा निर्धार, बेळगावात दोन जागा जिंकणार
Prashant Babar Ncp News
Konkan News : कोकणात पुन्हा भाजपचा शिवसेनेला धक्का; सत्ता राखण्यात मिळवले यश

राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा अध्यक्ष भारत जाधव यांनी एक अधिकृत पत्र काढत बाबर यांच्यावर कारवाई केली आहे. जाधव आपल्या पत्रात म्हणतात की, पक्षाने दिलेल्या पदाचा मान राखला नाही. पक्षाबाबत चुकीची माहिती प्रसारीत करणे. पक्ष व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे. शहराध्यक्ष यांना फोन करून वादावादी करणे, इत्यादी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com