पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Vitthal Sugar Factory) अध्यक्ष भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बोलावलेल्या बैठकीत आज (ता. २ जून) राडा झाला. उसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला भर बैठकीतच भालके यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार आज पंढरपूर (Pandharpur) येथे दाते मंगल कार्यालयात झाला. सभेत राडा झाल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (NCP office bearers beat up a farmer demanding sugarcane bill)
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आज सत्ताधारी भालके गटाची विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत रोपळे येथील शेतकरी सभासद जगन भोसले यांनी थकीत उस बिलाची मागणी करताच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला शिवीगाळ करत व्यासपीठावरच नेत्यांसमोर मारहाण केली. यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.
श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते. प्रमुख नेत्यांसमोरच शेतकऱ्याला मारहाण झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यावेळी रोपळे येथील शेतकरी जगन भोसले यांनी माईकवर येऊन आपण अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे उसाचे बिल द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत मला उसाचे बिल मिळाले नाही, तर अनेक भाषणं केली. पण त्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही, अशी व्यथा त्याने मांडली. त्यावेळी चिडलेल्या भालके यांच्या कार्यकर्त्यांनी जगन भोसले या शेतकऱ्याना धक्काबुक्की करत मारहाण केली.
श्री विठ्ठल कारखाना प्रमुख लोकां समोरच राडा झाल्याने काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले होते. दरम्यान, विठ्ठल काखान्यासाठी उद्यापासून (ता. ३ जून) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीत थकीत ऊस बिल प्रश्न मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
या घटनेशी राष्ट्रवादीचा संबंध नाही : रणजित पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित पाटील यांनी यांसदर्भात बोलताना सांगितले की, या घटनेशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. आम्ही सर्वजण पक्षाचे पदाधिकारी म्हणून नव्हते तर भालके गटाचे कार्यकर्ते म्हणून त्या बैठकीला गेलो होतो त्यामुळे मारहाणीच्या घटनेशी पक्षाचा कोणताही संबंध नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.