नागपूर : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर झालेल्या नरखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत देशमुख यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र आले होते. त्यानंतरही त्यांच्या पॅनेलने अकरापैकी आठ जाग जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. (Anil Deshmukh's panel wins Narkhed kharedi Vikri Sangh elections)
काटोल मतदारसंघातील नरखेड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक ४५ वर्षांनंतर प्रथमच झाली आहे. त्या निवडणुकीत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या पॅनेलच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र आले होते. विशेष म्हणजे देशमुख हे तुरुंगातून सुटल्यानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जात होते, त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
खरेदी विक्री संघाच्या अकरा जागांपैकी ८ जागा देशमुख यांच्या पॅनेलने जिंकल्या आहेत. उर्वरीत तीनही जागा विरोधकांनी सेवा सहकारी गटातील जिंकल्या आहेत. त्यात राष्ट्रवाचे कार्यकर्ते लोकेश काळे यांचा समावेश आहे, तर उर्वरीत दोन जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर होत असलेल्या पहिल्याचा निवडणुकीत देशमुख यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
नरखेड खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील यशाबद्दल माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, आमच्या विरोधात राज्यातील जेवढे म्हणून पक्ष आहेत, ते सर्व एकत्र आले होते. पण, आमचे सर्वच उमेदवार हे सरासारी दीडशे मतांच्या फरकांनी विजयी झाले आहेत. मधल्या काळात मी दीड ते पावणे दोन वर्षे मतदारसंघाच्या बाहेर हेातो. त्यानंतरही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकलो आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.