Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama

Sameer Wankhede News: समीर वानखेडेंची 'सीबीआय'कडून तीन तास चौकशी; 'या' प्रश्नांची उत्तरं वानखेडेंनी टाळली?

Aryan Khan Case- CBI : 'सीबीआय'ने आज समीर वानखेडेंची तब्बल तीन तास चौकशी केली
Published on

Mumbai : आर्यन खान ड्रग्जप्रकरणी 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची 'सीबीआय' चौकशी करत आहे. समीर वानखेडे यांची शनिवारी पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज रविवारी पुन्हा तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली.

तीन तासांच्या चौकशीनंतर समीर वानखेडे 'सीबीआय'च्या कार्यालयाबाहेर पडले. आज समीर वानखेडे यांच्या चॅट संदर्भात 'सीबीआय'कडून चौकशी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Sameer Wankhede
Arms Stockpile Case News : शस्त्रास्त्र साठा प्रकरणातील आरोपी मुस्तफाला जामीन नाहीच..

समीर वानखेडे यांनी या प्रकरणाची चौकशी करत असताना न्यायालयात सादर केलेल्या चॅट अगोदर का दाखवल्या नाहीत? 'सीबीआय'ने गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्या फेव्हरमधील चॅट वानखेडे यांनी कशा बाहेर काढल्या? जेव्हा समीर वानखडे यांना खाजगी व्यक्ती के.पी.गोसावी यांच्यासंदर्भात विचारले तर त्याचं उत्तर का देत नाहीत?

वानखेडे यांनी के.पी.गोसावी याच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड असूनही त्याला तपासात सहभागी का केलं? याचे उत्तर त्यांनी का दिलं नाही?, अशा अनेक प्रश्नाचे उत्तर समीर वानखडे यांनी दिलेले नाही. त्यामुळे याबाबत त्यांची आज सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात आली.

Sameer Wankhede
Pune News : कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारलेल्या आरोपीकडे आढळला मोबाईल ; येरवडा कारागृहातील सुरक्षा..

दरम्यान,'सीबीआय' समीर वानखेडे यांची चौकशी करत असताना खोटे पुरावे सादर करून तपासाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

(Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com