Prithviraj Chavan : शिवसेनेचा झाला आता 'राष्ट्रवादी'चा निकाल काय? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

Shiv Sena : संविधानाची पायमल्ली झालेली आहे. स्पष्टपणे शिवसेनेच्या आमदारांनी पक्षांतर केले आहे.
   ajit pawar, Prithviraj Chavan, sharad pawar
ajit pawar, Prithviraj Chavan, sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Political News : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची, याचा निकाल दिला असून शिवसेना एकनाथ शिंदेंची आता स्पष्ट झाले आहे, तर आता 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल काय लागू शकतो. या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निकाल काय लागणार, याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सरकारनामा'ला खास मुलाखत दिली आहे.  

   ajit pawar, Prithviraj Chavan, sharad pawar
Dheeraj Kumar Health Dept : IAS धीरज कुमारांनी कुणाच्या दबावाखाली 8 हजार कोटींचे टेंडर काढले?

शिवसेनेच्या लागलेल्या निकालाबाबत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, या निकालात दोन भाग आहेत. यात एक संवैधानिक, कायदेशीर पैलू आहे. दुसरा पैलू राजकीय फायदा, तोटा काय होणार आहे. शिवसेना (ShivSena) कुणाची, याबाबतचा संपूर्ण निकाल राजकीय दृष्टिकोनातून दिला गेला. कायद्याची, संविधानाची पायमल्ली झालेली आहे. स्पष्टपणे शिवसेनेच्या आमदारांनी पक्षांतर केले असताना त्यांना निलंबित करण्याची गरज असताना विधानसभाध्यक्षांनी तर्कवितर्क करून सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना त्याच्याविरोधात काहीतरी निष्कर्ष काढून हा निकाल दिला आहे. यावर संबंधित (ठाकरे गट) सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावतील आणि अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाला घ्यावा लागेल. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचा निकाल काय लागणार?

शिवसेनेचा जो निकाल लागला त्याबाबत 31 जानेवारीपूर्वी न्यायालयाने मत प्रदर्शित केले नाही. तसेच जे काही अपील शिवसेनेने दाखल केले आहे, त्याची सुनावणी घेऊन अंतिम फैसला दिला नाही, तर देशात हाच निर्णय कायदा म्हणून पुढे जाईल. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निकाल काही वेगळा लागणार नाही. सध्या घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. सरकार किंवा विधिमंडळ यांचा थेट मुकाबला सर्वोच्च न्यायालयाबरोबर आहे, असे चव्हाण म्हणाले.

सेटिंग... सेटिंग निकाल?

शिवसेनेचा निकाल हा सेटिंग होता की नाही, हा शब्दप्रयोग मी करणार नाही. परंतु, विधानसभाध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्याला स्वायत्तता असून ते कोणाच्या अधीन नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणे हे परंपरेला सोडून आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना भेटणं हे अक्षम्य चूक आहे. या भेटीमुळे जो काही संदेश गेला तो विधिमंडळाचा आणि संविधानाचा घोर अपमान आहे. संविधानाला वाचवायची जबाबदारी आता सर्वोच्च न्यायालय पार पाडेल का, याबाबतची मला शंका आहे. शेवटी जनतेलाच संविधान वाचवावे लागेल, असेदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

R...

   ajit pawar, Prithviraj Chavan, sharad pawar
Dr. Shrikant Shinde : देर आये दुरुस्त आये..! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com