Pune News : शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला अवघे काही तास शिल्लक असताना विविध पक्षातील नेते निकाल बाबत विविध कयास लावत आहेत. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे महाविकास आघाडी बरोबरच महायुतीतील पक्षांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारला आहे.
शिवसेना अपात्रता प्रकरण अंतिम टप्प्यात आले असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतलेली भेट ही सध्या सर्वात सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे.या भेटीमुळे विरोधी पक्षातील नेत्यांना नार्वेकर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या निकालाबाबत शशनकता वाटत आहे.
त्यामुळे विरोधी पक्षातील विविध नेते याबाबत आपलं मत व्यक्त करत आहे.पुण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्ध माध्यमांशी संवाद साधत आपले मत मांडले. चव्हाण म्हणाले, विधान सभा अध्यक्ष नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट संसदीय परंपरेला धरून नाही. माझ्या २० वर्षाच्या संसदीय इतिहासमध्ये आणि १० वर्षाच्या मंत्रिमंडळ इतिहासमध्ये असं कधी नाही. झालं की, विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे गेलेले कधीही पाह्यलं नाही. हे परंपरेला सोडून हे घडलेले आहे. त्यामुळे कशा प्रकारचा निर्णय येणार आहे याचा अंदाज आपल्याला येत असल्याचे चव्हाण म्हणले.
चव्हाण पुढे म्हणले, आजचा निकाल अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल घटनात्मक दृष्टीने पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ मध्ये आला. मात्र या कायद्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे हा कायदा बदलण्याची वेळ अली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर सोळा आमदारांना अपात्र केले पाहिजे. त्यांना पुढील निवडणूक लढवे पर्यंत मंत्रिपदावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. मात्र विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात आणि ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत असं होणार नाही. या निकालाला १.५ वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला आहे. त्यामुळे निकाल काय येईल याचा अंदाज आम्हाला असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.