Sharad Pawar Solapur Tour : माेहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला येणाऱ्या शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द

LOk Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पवारांचा उद्या (ता. 16 एप्रिल) होणारा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 15 April : माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार र्धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (ता. १६ एप्रिल) सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, इतर मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पवारांचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी याला दुजोरा दिला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी (ता. 14 एप्रिल) अकलूजच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत्या मंगळवारी मी सोलापूरच्या (solapur) दौऱ्यावर येणार आहे, असे सांगितले होते. तसेच, काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि मोहिते पाटील यांच्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पवारांचा उद्या (ता. 16 एप्रिल) होणारा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Solapur Lok Sabha : ‘तुमचा कार्यक्रम करणं फार अवघड नाही’; भालके समर्थकांचा शिंदेंना खणखणीत इशारा

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता पक्षाकडून कोणता नेता येतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर रविवारी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. त्या स्नेह भोजनाला ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकापचे जयंत पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार नारायण पाटील, धनाजी साठे व मतदारसंघातील इतर महत्वाचे नेते उपस्थित होते.

Sharad Pawar
Narendra Patil : नरेंद्र पाटील यांनी वाढविले उदयनराजेंचे टेन्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

sachin kalyanshetti-ranjitsinh mohite patil
Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak
Dhairyasheel Mohite Patil-Jaykumar Gore
 dhairyasheel mohite patil