Wai Politic's : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अरुणादेवी की नवीन चेहरा; गोरेंसमोर गळ्यात गळे घालणारे पिसाळ-ननावरे काय करणार?

Jillha Parishad Election : बावधन गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने वाई तालुक्यातील राजकीय समीकरणात बदल झाले आहेत. अरुणादेवी पिसाळ, कामिनी भोसले, रुतुजा शिंदे यांच्या नावांची चर्चेला उधाण आले आहे.
Arunadevi Pisal
Arunadevi Pisal Sarkarnama
Published on
Updated on
  1. वाई तालुक्यातील बावधन गट, जो माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तो पुन्हा निवडणुकीच्या चर्चेत आहे.

  2. या वेळी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची स्वप्ने अपूर्ण राहिली आहेत.

  3. संभाव्य उमेदवारांमध्ये अरुणादेवी पिसाळ, कामिनी भोसले, ऋतुजा शिंदे आणि मनीषा गाढवे यांची नावे चर्चेत आहेत.

अनिकेत शिंदे

Satara, 17 October : वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बावधन गट हा माजी मंत्री (कै.) मदनराव पिसाळ यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु 2017 च्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटाची जागा वगळता दोन्ही पंचायत समिती गणामधून काँग्रेसचे दीपक ननावरे आणि ऋतुजा शिंदे विजयी झाल्या होता. त्यानंतर 2025 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

बावधन गट (Bavdhan) या वेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा स्वप्नभंग झाला आहे. त्यामुळे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ (Arunadevi Pisal) पुन्हा मैदानात उतरणार का? नवीन चेहऱ्यांमध्ये माजी सभापती मदन माधव भोसले यांच्या पत्नी कामिनी भोसले यांची नावे चर्चेत आहेत. शेंदूरजणे गणातून माजी पंचायत समिती सदस्या ऋतुजा विराज शिंदे, पंचायत समितीच्या माजी सदस्या मनीषा गाढवे यांच्या नावाची चर्चा आहे.

बावधन हा जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटासाठी सर्वसाधारण महिला, तर त्याअंतर्गत येणाऱ्या बावधन पंचायत समिती गण सर्वसाधारण, तसेच शेंदूरजणे गणासाठी सर्वसाधारण महिला राखीव आहे. बावधन गट हा गेल्या 20 वर्षांपासून महिलांसाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे यावेळी तो गट खुला राहील, या अपेक्षेने अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते.

सुमारे वीस वर्षांपूर्वी रेखाताई ननावरे, हेमलता ननावरे, अरुणादेवी पिसाळ आणि 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शारदा ननावरे या निवडून आल्या होत्या. या गटातून अरुणादेवी पिसाळ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. नवीन चेहऱ्यांमध्ये वाई पंचायत समितीचे माजी सभापती मदन माधव भोसले यांच्या पत्नी कामिनी भोसले, तर शेंदूरजणे गणाकडून ऋतुजा विराज शिंदे, मनीषा गाढवे यांच्या नावांची चर्चा आहे.

Arunadevi Pisal
Dilip Mane On Congress : भाजपत जाता जाता माजी आमदाराने काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले; ‘माजी आमदार असूनही हर्षवर्धन सपकाळ मला...’

बावधन गण सर्वसाधारण झाल्याने यावेळी येथे इच्छुकांची गर्दी आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बावधन येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. विजयसिंह पिसाळ आणि भाजप तालुकाध्यक्ष ननावरे यांनी गळ्यात गळे घालून एकत्र राहणार असल्याचे कार्यकर्त्यांसमोर सांगितले होते.

परंतु पंचायत समिती सदस्य पदासाठी खुले आरक्षण पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. विजयसिंह पिसाळ आणि दीपक ननावरे यांपैकी कोण कोणासाठी माघार घेणार? अन्यथा दोघे स्वतंत्र लढणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असे झाल्यास दीपक ननावरे यांना खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

या वेळी मनसेचे मयूर नळ, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी देखील शड्डू थोपटले आहेत. काँग्रेसमधून विलास पिसाळ, तर राष्ट्रवादीतून (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील) माजी उपसभापती मदन भोसले, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कदम, उपसरपंच उदयसिंह पिसाळ, शिवाजीराव भोसले, विक्रम पिसाळ, प्रणीत पिसाळ-पाटील आदी इच्छुकांच्या नावांची चर्चा होत आहे.

Arunadevi Pisal
Dilip Mane : माझ्या भाजपप्रवेशाबाबत सुभाष देशमुखांना काय अडचण आहे का? दिलीप मानेंना मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ शब्द!

प्रणीत पिसाळांना उमेदवारीची अपेक्षा...

किसन वीर कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ-पाटील यांनी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर किसन वीर कारखान्याचे संचालकपद वगळता कोणतेही पद मिळाले नाही. त्यामुळे मुलगा प्रणीत पिसाळ-पाटील यांच्या उमेदवारीची अपेक्षा कायम राहणार आहे. शेंदूरजणे गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने माजी पंचायत समिती सदस्या ऋतुजा शिंदे पुन्हा मैदानात उतरणार का? नवीन चेहऱ्याला संधी देणार, याची उत्सुकता आहे. मनीषा गाढवे, योगिता चौधरी यांपैकी कोणाला मतदार साथ देणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Q1. बावधन गट कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा बालेकिल्ला मानला जातो.

Q2. या वेळी बावधन गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
तो सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

Q3. संभाव्य उमेदवार कोण आहेत?
अरुणादेवी पिसाळ, कामिनी भोसले, ऋतुजा शिंदे आणि मनीषा गाढवे ही प्रमुख नावे आहेत.

Q4. मागील निवडणुकीत कोण विजयी झाले होते?
काँग्रेसचे दीपक ननावरे आणि ऋतुजा शिंदे यांनी मागील निवडणुकीत विजय मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com