Kolhapur North Assembly Constituency : राष्ट्रवादी इरेला पेटली, कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून NCP अन् काँग्रेसमध्ये टशन

Kolhapur North Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी मतदार संघ राष्ट्रवादीकडे घेण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली.
sharad pawar | Nana Patole
sharad pawar | Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट) आणि काँग्रेस या तीनही पक्षाने उमेदवारीबाबत चाचपणी केली आहे. त्यानंतर उत्तरमधून कोणाला उमेदवारी दिली जावी, याबाबत रस्सीखेच सुरू आहे.

उत्तरमधून विद्यमान काँग्रेसचा आमदार असल्यानं येथे काँग्रेस दावा करू शकते. तर, ठाकरे गटानं पोटनिवडणुकीत माघार घेतल्यानंतर त्यांचाही मतदार संघावर दावा ठाम आहे. तसेच, लोकसभेची जागा काँग्रेसला दिल्यानंतर उत्तर मतदार संघ आपल्याकडे असावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते इरेला पेटले आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवारसाहेबांची भेट घेणार असून जागेबद्दल तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. चंदगड, राधानगरी-भुदरगड आणि कागल हे आपले पारंपारिक मतदारसंघ असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. लोकसभेला कोल्हापूर काँग्रेसला ( Congress ), तर हातकणंगले शिवसेना ठाकरे गटासाठी सोडला होता. येथील उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळे कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

sharad pawar | Nana Patole
Video Uddhav Thackeray : "पापा को बोलो वॉर रूकवा दो", बांगलादेशवरून ठाकरेंनी मोदींना डिवचलं

सध्या कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव आमदार आहेत. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणूक झाली. तेव्हा, महाविकास आघाडीचं सरकार होते. या पोटनिवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर लढण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या सूचनेनुसार शिवसेनेने माघार घेतली. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन गटात विभागली आहे. तर लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत.

जशा वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, तशा स्थानिक पातळीवर जागा मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या हालचालींना जोर धरला आहे. शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार उतरविण्याची तयारी करत आहेत. ठाकरे गटाकडून सध्या दोन उमेदवार रिंगणात उतरू इच्छित आहेत. पण, मातोश्रीवरून आदेश आला, तरच ते निवडणूक लढतील, असं सांगितलं जातं. दुसरीकडे काँग्रेसनं अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यापूर्वी राष्ट्रवादीनं ही जागा मिळण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपासून धाव घेण्याची तयारी ठेवली आहे. ही जागा राष्ट्रवादीला मिळविण्यात यश आले, तर जिल्हाध्यक्ष व्ही.व्ही पाटील हे मैदानात उतरतील.

sharad pawar | Nana Patole
Uddhav Thackeray : "चंद्रहारच्या पराभवाचं शल्य, पण...", विशाल पाटील अन् विश्वजित कदमांच्या भेटीनंतर ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

जागांचा तिढा सुटणार कसा?

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः कोल्हापूर उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गटाने आत्तापासूनच दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशीच परिस्थिती शिवसेना व काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार कसा? बंडखोरी होणार की मनधरणी होणार? यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com