Birth Certificate for Bangladesh Citizens : किरीट सोमय्या घुसखोरांच्या मागावर; मालेगावचे तहसीलदार निलंबित, तर आता मोर्चा यवतमाळकडे...

BJP Kirit Somaiya Collector Yavatmal Nashik Malegaon Tehsildar suspended birth certificates Rohingya Bangladeshi infiltrators : भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीत घुसखोर बांगलादेशींचा जन्मप्रमाण दिल्याप्रकरणी तहसीलदारांचे निंलबन झाले आहे.
 Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिर्डीतील महाविजय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात रोहिंगे अन् बांगलादेशीच्या घुसखोरीविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या या मुद्यावर राज्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

याप्रकरणात तक्रार केल्यानंतर मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना निलंबित, तर नायब तहसीलदार संदीप धरणकर यांची विभागीय चौकशीचा आदेश काढण्यात आला आहे. याशिवाय किरीट सोमय्या यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची याच मुद्यावर भेट घेतली.

महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त बांगलादेशींची घुसखोरी झाली आहे. नाशिकमधील (Nashik) मालेगाव आणि अमरावतीमधील अंजणगाव सुर्जी तहसील कार्यालयातील बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचे बनावट पत्र दिल्याची तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या स्वतः तहसीलदार कार्यालयात भेटी दिल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने 'SIT' देखील स्थापन केली.

 Kirit Somaiya
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे 'बिनडोक', तर आदित्य ठाकरे 'बालिश'; बावनकुळेंचे जशास तसे उत्तर

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नाशिक आणि अमरावती जिल्ह्यातील घुसखोरीच्या या प्रकारावर तक्रार केल्यानंतर त्यांनी यवतमाळी जिल्ह्याकडे कारवाईसाठी मोर्चा वळवला आहे. यासाठी त्यांनी यवतमाळचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेत, चर्चा केली. यानंतर जन्म, मृत्यू नोंदणीला स्थगिती देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 11 हजार दाखले नोंदणीसाठी अर्ज आले आहेत.

 Kirit Somaiya
Santosh Deshmukh Case : धक्कादायक! गॅस सिलेंडरचा पाईप, क्लच वायर अन्.., संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांची माहिती आली समोर

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची तक्रार केली होती. यात तथ्य आढळल्याने मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर नायब तहसीलदार संदीप धरणकर यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

किरीट सोमय्या यांची राज्यात दोन लाख बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. मालेगाव इथं बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्मदाखले दिले आहेत. त्यांना आधारकार्ड देण्यात आले आहे. त्यांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणात काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. बांगलादेशी-भारत सीमेवर एजंटगिरीत काही राजकीय, अतिरेकी संघटनांचा हस्तक्षेप असल्याची तक्रार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com