Ahmednagar Politics : राष्ट्रवादीचे शेलार थेट हैदराबादेत; 'बीआरएस'मध्ये प्रवेशाची चर्चा !

NCP and BRS : राष्ट्रवादीत जगतापांचे वजन वाढल्याने शेलार नाराज
Chanshyam Shelar
Chanshyam ShelarSarkarnama

NCP's Ghanshyam Shelar may join BRS : अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार हे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाच्या संपर्कात आहेत. ते सध्या हैदराबाद येथे असून ते 'बीआरएस'चे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असून ते पक्षांतर करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. (Latest Marathi News)

शेलार हे समर्थकांसह बुधवारी (ता. १४) सकाळी हैदराबाद येथे दाखल झाले. काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) नाराज असल्याचे दिसत होते. त्यातच त्यांचे पक्षातील विरोधक असणारे माजी आमदार राहुल जगताप यांचे पक्षात वाढणारे वजन त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत होते. जगताप यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड केली. त्यावेळीच विधानसभेची उमेदवारीही त्यांनाच देण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे शेलार अस्वस्थ होते.

Chanshyam Shelar
Chhtrapati Sambhajinagar News : तीन संशयित कुत्रे पकडले पण बूट कुणी पळवला? माजी महापौरांच्या बुटासाठी यंत्रणाच कामाला !

शेलार (Ghanshyam Shelar) यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. ते साडेचार हजार मतांच्या फरकाने आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून पराभूत झाले. याहीवेळी पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल असे ग्रृहित धरुन त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला होता. तथापि श्रीगोंदा खरेदी विक्री संघ व बाजारा समितीत जगताप यांनी एकहाती सत्ता आणली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची टाकलेली थाप विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी पुरसी होती.

Chanshyam Shelar
Sharad Pawar Threat Case : पवारांना धमकी दिल्याची दोन कारणे उघडकीस ; महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे..

राहुल जगताप (Rahul Jagtap) यांचे पक्षातील वाढते वर्चस्व शेलार यांना पक्षांतर करायला भाग पाडत असल्याचे बोलले जाते. दरम्यान, याबाबत शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते समर्थकांसह हैदराबाद येथे असून 'बीआरएस' (BRS) मध्ये प्रवेशाची अंतिम बोलणी होत आहे.

Chanshyam Shelar
Solapur News: सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या पाडकामाला सुरुवात; परिसरात कडक बंदोबस्त

शेलार यांची आजवरची राजकीय भूमिका

- १९८६ मध्ये युवक ग्रामविकास संघटना स्थापन केली

- त्यानंतर शिवसेनेशी संपर्क

- भाजपाची १९९३ मध्ये विधानसभेची उमेदवारी

- १९९९ ला राष्ट्रवादीत प्रवेश

- त्यानंतर पक्षाने एसटी महामंडळाचे संचालक व जिल्हाध्यक्ष केले

- राज्य साखर संघाचे संचालकही झाले.

- २०१९ ची विधानसभा घड्याळाच्या चिन्हावर लढले

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com