Sanjaymama Vs Abhijeet Patil : संजयमामा शिंदेंना अभिजीत पाटलांचा टोला; ‘तुम्ही मंद आहात, त्याला मी काय करू?’

Mahda Political News : काहींनी सांगितलं की, आम्ही 365 दिवसं पळलो आणि हे एक महिन्यात पुढारी झालं. मी 2002 मध्ये जनसेवक संघटनेचा पंढरपूरचा युवक तालुकाध्यक्ष होतो. माझी 22 वर्षे राजकारणात गेली आहेत.
Abhijeet Patil-Sanjaymama Shinde
Abhijeet Patil-Sanjaymama ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 August : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी नाव न घेता आमदार अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला आमदार पाटील यांनी उत्तर दिले. तुम्ही मंद आहात, त्याला मी काय करू? माझी काय चूक आहे, तेच मला कळत नाही, असा सवाल केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे-पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.

तीन टर्म झालेल्यांना अजून आमदारकी कळाली नाही आणि एका महिन्यात आमदार झालेल्यांना काय कळावी, असा टोला माजी आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कार्यक्रमात नाव न घेता माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना लगावला होता. त्याला आमदार पाटील यांनी आज (ता. 15 ऑगस्ट) उत्तर दिले आहे.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) म्हणाले, तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात 55 विषयांवर बोललो. दुसऱ्या अधिवेशनात 60, तर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात 117 विषयांवर बोललो. जिथं वेळ मिळाला, तिथं प्रामाणिकपणे बोललो आहे.

विधानसभेच्या कामकाजात भाग घेतल्यामुळे तसेच सभागृहातील हजेरीमुळे मला तालिका अध्यक्षपदाची संधी मिळाली. माढा तालुक्याच्या आमदाराला ही संधी यापूर्वी कधी मिळाली होती का? तालिका अध्यक्ष असतो, हे मी झाल्यामुळेच किती तरी जणांना कळलं. काम केल्यावरच संधी मिळते, असेही आमदार पाटील यांनी संजयमामांना सुनावले.

Abhijeet Patil-Sanjaymama Shinde
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचा परिचारकांवर पलटवार; ‘होय, मी पाया पडतो, माझा कारखाना अन्‌ सभासदांसाठी; तुमच्यासारखं पाय पडून विधान परिषद मागत नाही’

अभिजीत पाटील म्हणाले, तुम्ही काम नाही केलं तर तीन टर्म काय...? पण माझं म्हणणं काय आहे माहिती काय...? माझी तीन टर्म झाल्यावर मला कळतं का नाही ते बघू की. आताच कशाला गडबड करायची आहे.

Abhijeet Patil-Sanjaymama Shinde
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनी दाखवला राज ठाकरेंना आरसा; ‘अपक्ष आमदार निवडून येतात, पण तुमच्या पक्षाचा एकही निवडून येत नाही’

मूळ मुद्दा काय आहे की, त्यांनी माढा तालुक्यात एक स्वाभिमानी परिवार तयार केला होता. त्या स्वाभिमानी परिवाराच्या नावावर त्यांनी कर्ज काढलं, पैसे गोळा केले आणि खासगी साखर कारखाना काढला. तो कारखाना विकला आणि करमाळा तालुक्यात जाऊन निवडणूक लढवतात आणि मी कारखाना नीट चालवतो, असे सांगतात. तसेच पंढरपुरात येऊन विठ्ठल कारखान्यावर बोलतात, असा टोलाही त्यांनी संजयमामा शिंदेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com