
Solapur, 15 August : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्या टिकेला आमदार पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. होय मी पाया पडून 300 ते 350 कोटी आणतो. माझ्या कारखान्यावर आणि सभासदांवर वेळ आल्यावर मी कोणचेही पाय धरेन. पण पाया पडून मागच्या दाराने विधानपरिषद तर मागत नाही ना, असा टोलाही आमदार पाटील यांनी परिचारकांना लगावला.
आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) म्हणाले, महेश नानांनी सांगितलं की, सगळ्या पार्ट्या इथं आहेत, तर भोसे येथे परवा एक झालेले कोण होते? ते का एक झाले होते? आणि का एवढे भीत आहेत? तेच कळेनासे झाले आहे. म्हणजे आता एक व्हायचं राहायल काय? विधानसभेला हे सर्व एकच होते की, त्यांनाच पाडलंय की आपण. आता कुठुन नवीन आली आहेत. एक फक्त मागे राहिलेला होता, तो पुढे आला आहे.
भोसे येथील परवाचा कार्यक्रम राजकीय नसतानाही राजकीय बोललं गेलं. पाया पडून 300 ते 350 कोटी आणतंय, असे सांगितलं गेलं. होय मी नक्की आणतोय. माझ्या साखर कारखान्याच्या (Sugar Factory)सभासदांवर वेळ आल्यावर मी कुणाचेही पाय धरेन. मी माझ्या कारखान्याला बट्टा लागू देणार नाही. कोण ऐकायला आले असेल तर जाऊन सांगा की लयं निब्बर बोलतंय म्हणून, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अभिजीत पाटील म्हणाले, आपली परंपरा काय आहे. वारकरी संप्रदायात आपण एकमेकांचे माऊली म्हणून पाय धरतो. पाया पडणं ही महाराष्ट्राची वारकरी परपंरा आहे. म्हणून मी पाया पडतोय, नम्रतेने वागतोय. तुमच्यासारखं पाया तर पडून घेत नाही ना? मी माझ्या कारखान्यासाठी, सभासदांसाठी पाय पडतो. मी पाया पडून मागच्या दाराने विधानपरिषद तर मागत नाही. माझ्या सभासदांसाठी मी मागतोय, हे माझे कर्तव्य आहे.
काहींनी सांगितलं की, आम्ही 365 दिवसं पळलो आणि हे एक महिन्यात पुढारी झालं. मी 2002 मध्ये जनसेवक संघटनेचा पंढरपूरचा युवक तालुकाध्यक्ष होतो. माझी 22 वर्षे राजकारणात गेली आहेत. बापूंची बॅटरी 2004 मध्ये माझ्या हातात होती. त्यानंतर 2005 मध्ये मी ग्रामपंचायत सदस्य होतो. मी जवळपास 20 ते 22 वर्षे खर्च केली आहेत, त्यानंतर मला कुठंतरी ओळखला लागली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
उचलतंय का नाही बघण्यासाठी आम्हाला रात्री दोन वाजता फोन करतात
ते म्हणाले, लोकांनी मला तीस हजार 600 मतांनी निवडून दिलं आहे आणि त्यांना निवडून देत नाहीत. तेच कबूल करतात. 365 दिवस झिजून काय उपयोग आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे झिजला असता तर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. ते झिजतच नाहीत. रात्री आठलाच फोन बंद करून ठेवतात. एकजण तर रात्री एक आणि दोन वाजता त्यांना फोन करण्याचे धाडस करतंय का? आम्हाला कधीही फोन करतात आणि ‘उचलता की नाही, हे बघण्यासाठी फोन केलाय’, असं सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.