NCP SP Politics : शरद पवारांचा पक्ष भाकरी फिरवणार? कोणाला संधी आणि कोणाला बाहेरचा रस्ता, नव्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Shashikant Shinde on NCP SP State Council : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाची सर्व सुत्रे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे आली आहेत.
Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

  2. मात्र जयंत पाटील यांनी नेमलेली कार्यकारणी अजूनही राज्यभर कार्यरत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता आहे.

  3. नवीन कार्यकारणीमध्ये कोणाला स्थान मिळेल आणि कोण वगळला जाईल, याची उत्सुकता पक्षात कमालीची वाढली आहे.

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या हातात घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलला असला तरी पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी नेमलेलीच कार्यकारणी सध्या राज्यामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षांची नवी कार्यकारणी कधी येणार? त्या कार्यकारणीमध्ये नेमकी कोणाकोणाला संधी मिळणार? आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार? याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाची सर्व सुत्रे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे आली आहेत. दरम्यान आमागी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर नव्या प्रदेशाध्यक्षांनी बैठकांचा सत्र सुरू केलं आहे. या आढावा बैठकांच्या माध्यमातून राज्यातील पक्षाची परिस्थिती जाणून घेण्यात येत आहे. नेमक्या कोणत्या पदाधिकाऱ्याचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि कुठे पक्ष कमी पडतोय याबाबतचा डाटा प्रदेशाध्यक्ष कलेक्ट करताना दिसत आहेत.

Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Jayant Patil : जयंत पाटलांचा गड ढासळतोय? त्यांच्याच जवळचा नेता भाजपमध्ये! हा योगायोग की महायुतीचा डाव?

आज पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे म्हणाले, पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येत आहे. पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा या बैठकीच्या माध्यमातून केली जातेय. पदाधिकाऱ्यांकडून अडचणी आणि सूचना ऐकून घेऊन सर्व गोष्टींवर तोडगा काढून पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम कसे करता येईल यावर कारवाई सुरू असल्याचं प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले.

याचवेळी त्यांनी, सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी कार्यकारणी लवकरच तयार करण्यात येणार आहे. याच दृष्टिकोनातून सध्या बैठका घेण्यात येत आहे. या बैठकीमध्ये कोण काम करत आहे आणि कोण काम करत नाही याबाबतचा आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच ज्याचे कांम चांगले असेल त्याच्या पाठीवर थाप मिळेल. तसेच जे काम करत नाहीत त्यांना कार्यकारणी मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

पक्षाची कार्यकारणी अशा पद्धतीने ॲक्टिव्ह पाहिजे की नेत्यांनी आवाज दिल्यानंतर रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे. त्याच पद्धतीची कार्यकारणी तयार करण्यात येणार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. तसेच कार्यकारणी मध्ये बदल करताना सर्व निकषांचा विचार केल्यानंतरच पदाधिकाऱ्यांना पद देण्यात येणार आहेत. प्रदेश युवक अध्यक्षासाठी देखील वयोमर्यादेची आठ असणार असल्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं.

Jayant Patil steps down from NCP Sharad Pawar faction; Shashikant Shinde likely to take charge as new Maharashtra state president.
Jayant Patil : थोरल्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जयंतरावांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा!

पडणारे प्रश्न :

1. शशिकांत शिंदे कोण आहेत?
– शशिकांत शिंदे हे आमदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नवे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले आहे.

2. जयंत पाटील यांची कार्यकारणी अजूनही का कार्यरत आहे?
– कारण नवा प्रदेशाध्यक्ष जरी नेमण्यात आला असला तरी नवी कार्यकारणी अधिकृतरित्या घोषित झालेली नाही.

3. नवी कार्यकारणी कधी जाहीर होणार?
– पक्षाच्या अंतर्गत गट चर्चेनंतर लवकरच नवे नियुक्तीपत्र जाहीर होण्याची शक्यता आहे.

4. कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया आहे?
– कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, नवीन संधीसाठी अनेकजण आशावादी आहेत.

5. कोणाला वगळण्यात येणार?
– याबाबत अधिकृत माहिती नसली तरी जयंत पाटील यांचे जवळचे काही सदस्य बाजूला ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com