Manohar Sapate : विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी महापौरांना हृदयविकराचा झटका

Solapur Crime News : पिठापूर येथून सपाटे हे शनिवारी सायंकाळी सोलापूरला आले होते. त्यानंतर सपाटे यांच्या छातीत दुखू लागले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचे सहकारी दत्ता भोसले आणि महादेव गवळी यांनी सपाटे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे
Manohar Sapate
Manohar SapateSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 July : स्वमालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये उतरलेल्या महिलेचा रुममध्ये घुसून विनयभंग करणारे सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय दत्ता भोसले यांनी दिली. दरम्यान, विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच सपाटे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल होता. त्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोलापूरच्या (Solapur) न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात मनोहर सपाटे हे आंध्र प्रदेशमधील पिठापूर येथे गेले होते.

पिठापूर येथून सपाटे हे शनिवारी सायंकाळी सोलापूरला आले होते. त्यानंतर सपाटे यांच्या छातीत दुखू लागले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचे सहकारी दत्ता भोसले आणि महादेव गवळी यांनी सपाटे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

सोलापूर शहरातील लकी चौकात सपाटे यांच्या मालकीचा शिवपार्वती लॉज आहे. न्यायालयीन कामासाठी पुण्याहून सोलापूरला आलेली संबंधित महिला ही 14 जून रोजी सपाटेंच्या शिवपार्वती लॉजमध्ये उतरली होती. सपाटे हे 17 जून रोजी मध्यरात्री बारानंतर संबंधित महिलेच्या रूममध्ये घुसले. त्या वेळी त्यांनी छेडछाड करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.

Manohar Sapate
Umesh Patil : 'सोलापूर जिल्ह्याचा डीएनए राष्ट्रवादीच्या विचाराचा; हाकेंची प्राध्यापक म्हणून घ्यायची लायकी नाही'

मनोहर सपाटे हे राजकीय नेते आहेत, त्यामुळे कोणी विश्वास ठेवणार नाही. तसेच, शिवपार्वती लॉज हा त्यांच्याच मालकीचा असल्याने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करतील, म्हणून संबंधित महिलेने त्यांचे 24 जून रोजी स्टिंग ऑपरेशन केले होते, तो व्हिडिओ पाेलिसांना दाखवला, त्यानंतर सपाटेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी

विनयभंगाची तक्रार आणि सोशल मीडियात त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षाची जनसामन्यांमधील प्रतिमा डागाळत आहे, त्यामुळे सपाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Manohar Sapate
Solapur Politic's : जयकुमार गोरेंच्या विधानामुळे खळबळ; सोलापुरातील आणखी कोणते नेते भाजपत प्रवेश करणार?

महिला आयोगाचा आदेश

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनोहर सपाटे यांच्या विनयभंग प्रकरणात सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चाकणकरांनी राज्य महिला आयोगाने सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना या प्रकरणी आवश्यक कारवाई करावी आणि आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com