Satara NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी कसली कंबर; साताऱ्यात विजय निश्चिय मेळावे

Jayant Patil News : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्हा पिंजून काढणार
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara Politics News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. बालेकिल्ला असलेल्या सातारमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात पाच विधानसभा मतदारसंघात विजय निश्चिय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

हे मेळावे येत्या सोमवारपासून (ता. 5) दोन दिवस पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि माण- खटाव (दहिवडी) मतदारसंघात होणार आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज जिल्ह्यात घुमणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील येत्या सोमवारी (ता. पाच) व सहा फेब्रुवारीला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात सातारा लोकसभा मतदार संघातील चार विधानसभा मतदारसंघात व माढा लोकसभा मतदार संघातील एक विधानसभा मतदार संघात विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil
Patan BJP : उदयनराजेंचे हात बळकट; विक्रमबाबा पाटणकरांवर फडणवीसांनी सोपवली मोठी जबाबदारी

सोमवारी पाटण मतदारसंघातील विजय निश्चय मेळावा सकाळी 11 वाजता पाटण येथे होणार आहे. तसेच कराड उत्तर व दक्षिण मधील कार्यकर्त्यांचा मेळावा दुपारी दोन वाजता अरण्या मंगल कार्यालय उंब्रज येथे होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता कोरेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा गीताई मंगल कार्यालय मार्केट यार्ड कोरेगाव येथे होणार आहे.

जयंत पाटील यांचा मुक्काम सातारा येथे असून दुसऱ्या दिवशी मंगळवार (ता. 6) सकाळी दहा वाजता माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा दहिवडी येथे होणार आहे. यानंतर जयंत पाटील हे माळशिरसकडे जाणार आहेत. या मेळाव्यांना जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते विजय निश्चय मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Jayant Patil
Patan Assembly Constituency : पालकमंत्री देसाईं विरोधात महाविकास आघाडी देणार तरुण चेहरा..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com