Patan Assembly Constituency : पालकमंत्री देसाईं विरोधात महाविकास आघाडी देणार तरुण चेहरा..!

Thackeray group aggressive against Shambhuraj Desai : उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम मैदानात उतरणार, महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करणार.
Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Patan Political : पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गटाने तर शंभूराज देसाई यांना अस्मान दाखवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी पाटणमधून तरुण चेहरा रिंगणात उतरविणार आहे. सध्या ठाकरे गट शिवसेनेकडे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सध्या येथे राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर तसेच उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम तसेच काँग्रेसचे हिंदुराव पाटील यांचे प्राबल्य आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना रोखण्यासाठी सक्षम उमेदवार सध्या महाविकासकडे नाही.

Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
BJP Politics : 'आधी कंगाल केले अन् आता मते मागता'; शेतकऱ्याने भाजपची लाजच काढली

पण त्यांच्यात एकजूट कायम राहिली आणि तरुण तडफदार चेहरा दिल्यास शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी आडवू शकते. तसेच ठाकरे गटाने तर कोणत्याही परिस्थितीत शंभूराज देसाई यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. गेल्या काही महिन्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या सभा पाटण तालुक्यात झाल्या असून त्या माध्यमातून त्यांनी चांगले रान उठवले आहे.

आता आगामी काही दिवसात उद्धव ठाकरे यांची सभा ही पाटणमध्ये घेण्याचे नियोजन चालले आहे. देसाई यांना अडविण्यासाठी शिवसेनेचे सुरू असलेल्या  प्रयत्नाना राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ आहे. पण ही पक्कड घट्ट होणे गरजेचे आहे. येथील शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर हे सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे.

त्यामुळे पाटणमध्ये पालकमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी ठाकरे गट शिवसेना तरुण, तडफदार चेहरा रिंगणात उतरविणार आहे. सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम हे पाटणमधून इच्छुक आहेत. त्यांनी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या पाटणमधील सभेचे उत्तम नियोजन केले होते.

त्यांना शरद पवार गट राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ मिळाली तर ते देसाई यांच्या विरोधात चांगली लढत देऊ शकतील. त्यामुळे या माध्यमातून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गट शिवसेनेकडून होण्याची शक्यता आहे.

(Edited by Amol Sutar)

Harshad Kadam, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
MP Sanjay Patil: विठ्ठल भक्तांची 75 वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य; खासदार पाटलांच्या प्रयत्नांना यश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com