सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यस्तरीय शिबिर शिर्डीत सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (Shivsena बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला आहे. या प्रवेशासाठी माजी उपमहापौर आणि शिंदे गटाच्या वाटेवर असलेले दिलीप कोल्हे, अमोल शिंदे आणि मनोज शेजवाल यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. (NCP women Congress office bearers from Solapur join Eknath Shinde group)
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात स्वागत केले. तसेच, त्यांना पक्षात योग्य तो मान-सन्मान देण्याची ग्वाही दिली. या वेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम नाना मस्के, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशीकांत शिंदे उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये सुनंदा साळुंके, (सोलापूर शहर, दक्षिण विधासभा अध्यक्षा), राजश्री कोडनूर(राष्ट्रवादी- शहर मध्य विधासभा अध्यक्षा), मनीषा नलावडे (राष्ट्रवादी-शहर कार्याध्यक्षा), जयश्री पवार(राष्ट्रवादी- शहर उपाध्यक्षा), अश्विनी भोसले, मारता आसादे, शोभा गवळी (तिघीही राष्ट्रवादी शहर महिला कार्यकारिणी सदस्या) यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सन्मान न मिळाल्याने पक्षांतर
अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करूनही काही ठराविक पदाधिकाऱ्यांनाच वरिष्ठांकडून झुकते माप मिळत होते. यातील काही पदाधिकारी असले तरी त्यांना निर्णय प्रक्रियेत कोठेही समावून घेतले जात नव्हते, त्याची खदखद त्यांच्या मनात होती. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीही त्याच कारणास्तव पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काहीजण कोल्हेंचे समर्थक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.