Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा थेट जयकुमार गोरेंना फोन; राष्ट्रवादी सदस्यांच्या निधीच्या गाऱ्हाण्यांवर पालकमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांना 'हा' शब्द!

NCP ZP Member Fund Issue : महायुतीतील निधी वाटपावरून अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जयकुमार गोरे यांना समान निधी देण्याची सूचना केली.
NCP ZP Member Meet Sunetra Pawar
NCP ZP Member Meet Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 September : महायुतीमधील तीन पक्षांमध्ये निधी वाटपावरून अंतर्गत कुरुबुरी आहेत. मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून केला जात आहे. सोलापुरात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मनमानी होत असल्याची तक्रार पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी बारामती येथे जात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. कार्यकर्त्यांची तक्रार ऐकताच उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोन करत निधी वाटपात राष्ट्रवादीच्या सदस्यांवर अन्याय होऊ नये. सर्वांना समसमान निधी मिळावा, अशी सूचना केली.

पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या मयुरी बागल, गीतांजली साळुंखे, शन्मुखी कोरके, सुप्रिया गायकवाड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे सोलापुरात निधीवाटपावरून होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रारीचा पाढा वाचला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर समसमान निधी वाटपाचा शब्द दिला आहे. त्यानुसार येत्या दोन ते चार दिवसांत निधी वाटप होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी बोलून दाखली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून भाजप उमेदवाराला मदत करूनही निधी वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांवर अन्याय केला जात आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतही दुजाभाव केला जात आहे. भाजपकडून मनमानी आणि पक्षपाती पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. भाजपचे पदाधिकारी स्वतः साठी अधिकचा निधी घेऊन इतर सदस्यांना तुटपुंजा निधी देत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दाखवून देण्यात आले.

NCP ZP Member Meet Sunetra Pawar
Solapur DCC Bank : कर्ज घेणाऱ्यांकडून वसुली करा अन्‌ आमचा निवडणुकीचा मार्ग मोकळा करा : राऊत-शिंदेंमध्ये खडाजंगीची चर्चा

जिल्हा परिषद सदस्यांची तक्रार ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना फोन केला. महायुतीमधील सर्व पक्षाच्या सदस्यांना समान निधी मिळाला पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत खुद्द पालकमंत्री गोरे यांनी समसमान निधी वाटपाचा दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. भाजपप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळायला हवा, अशी सूचना केला. त्यावर पालकमंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

NCP ZP Member Meet Sunetra Pawar
Indapur Politic's : हर्षवर्धन पाटलांच्या कार्यक्रमाला 7 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच्या बड्या नेत्याची हजेरी; राजकीय चर्चेला उधाण...

आम्हाला पालकमंत्र्यांकडून समान निधीची अपेक्षा : मयुरीताई बागल

निधी वाटपात कोणत्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही. भाजपच्या सदस्यांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना समसमान निधीचे वाटप केले जाईल, असा शब्द गोरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिला आहे, त्यानुसार निधीचे वाटप होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या मयुरीताई बागल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com