Indapur Politic's : हर्षवर्धन पाटलांच्या कार्यक्रमाला 7 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच्या बड्या नेत्याची हजेरी; राजकीय चर्चेला उधाण...

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यक्रमाला सात वर्षांनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे उपस्थित राहिले. या उपस्थितीमुळे पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Harshvardhan Patil-Balasaheb Thorat
Harshvardhan Patil-Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Pune, 14 September : माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यक्रमाला तब्बल 7 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच्या बड्या नेत्याने हजेरी लावली. माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे आवर्जून उपस्थित होते. काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाचा एखादा बडा नेता पाटील यांच्याकडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे राजकीय हवेचा रोख ओळखण्यात वाक्‌बगार असलेल्या पाटील यांचा पुन्हा मूळ प्रवाहाकडे प्रवास सुरू झाला की काय, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार (स्व) शंकरराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कार्यक्रमाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या नेत्यांनी महाविद्यालयातील शंकरराव पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. थोरात यांनी शंकरराव पाटील यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाटपात इंदापूर मतदारसंघ हा दत्तात्रेय भरणे हे विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. विधानसभेची २०१९ ची निवडणूक पाटील यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, पाटील यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागला होता.

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडताना कोणत्याही नेत्यांवर टीका केली नव्हती किंवा पक्ष सोडण्यासाठी त्यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला दोष दिला नव्हता. मात्र, इंदापूर शहरातील काँग्रेस भवनावरून त्यांचा पक्षासोबत वाद झाला होता. पाटील यांनी ती इमारत शेवटपर्यंत काँग्रेससाठी सोडली नव्हती. त्यामुळे त्यांचा काँग्रेस पक्षासोबत गेल्या ७ वर्षांत कोणताही संबंध राहिला नव्हता.

Harshvardhan Patil-Balasaheb Thorat
Solapur DCC Bank : सोलापूर डीडीसी बॅंकेच्या निवडणुकीत ट्विस्ट : बड्या नेत्याच्या तालुक्यातील सहा ठराव रद्द

मधल्या काळात राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाकडून २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली. पण, विधानसभेचा गुलाल काय त्यांच्या अंगाला लागू शकला नाही. राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर पाटील यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नव्हता, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचाय समितीच्या निवडणुका त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनुसार एकत्रित लढवल्या. त्यामुळे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री पाटील हे कट्टर विरोधक एकत्र आले होते.

Harshvardhan Patil-Balasaheb Thorat
Dilip Sopal : सोलापूर डीसीसी बॅंकेत दोन कट्टर विरोधकांची एन्ट्री होणार? दिलीप सोपलांचाही बॅंकेसाठी ठराव

तब्बल २० वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात राहिलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बदलत्या राजकीय हवेचा रोख ओळखण्यात पटाईत मानले जातात. त्यातूनच त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कार्यक्रमाला आमंत्रित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक वगळता इतर कोणत्याही निवडणुका दृष्टीक्षेपात नाहीत. मात्र, या माध्यमातून राजकीय पेरणीची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com