अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील गटबाजीवर तोडगा काढणार : जयंत पाटील

भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने यावर तोडगा निघणे आवश्यक आहे आणि तो तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे.
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पदाधिकारी निवडीवरून झालेल्या गटबाजीवर निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) व अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जाहीर केले. (NCP's factionalism in Mangalvedha taluka will be resolved : Jayant Patil)

मंगळवेढा नगरपालिकेतील पक्षनेते अजित जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे विजय खवतोडे, भारत बेदरे, सुनील डोके, सुरेश पवार आदींनी इस्लामपूर येथे जाऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी वरील घोषणा केली.

Jayant Patil
हर्षवर्धन पाटलांना धक्का : विद्यमान सरपंचांसह सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांना इस्लामपुरातील विविध भागात त्यांच्या गाडीतून फिरवून मंगळवेढा शहर राष्ट्रवादीतील पदाधिकारी बदलानंतर झालेल्या घडामोडीची सर्व माहिती जाणून घेतली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला गटबाजीचे ग्रहण परवडणारे नाही, त्यामुळे तयार झालेल्या दोन गटांत योग्य तो समझोता करण्यासाठी आपण वरिष्ठांच्या समवेत बैठक घेणार आहे.

Jayant Patil
मी आणि फडणवीस कमळासाठी आग्रही होतो; पण मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला

निवडीवरून झालेल्या वादळाबाबत आपण सुरुवातीला याबाबत योग्य तो समन्वय साधण्याची सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही ज्या काही घटना घडल्या, त्याची आपल्याला माहित नाही. तरीही भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने यावर तोडगा निघणे आवश्यक आहे आणि तो तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Jayant Patil
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

पाच वर्षांपूर्वी राज्यात सत्ता नसताना मंगळवेढा तालुक्यातील नगरपालिकेवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली होती. मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषद व विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला वर्चस्व राखण्यात अपयश आले होते. नगरपालिका निवडणूक दिलेल्या जाहीरनाम्यातील बहुतांश गोष्टींची राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्तता केली आहे. पण ऐन नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात गटबाजीला सुरुवात झाली आहे. सुदैवाने ही निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे या निवडणुका येईपर्यंत मंगळवेढ्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेला पुढाकार हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com