हर्षवर्धन पाटलांना धक्का : विद्यमान सरपंचांसह सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

सरपंच आणि सोसायटीच्या माजी अध्यक्षांनी हर्षवर्धन पाटील गटाची साथ सोडल्याने त्यांना धक्का मानला जात आहे.
Dattatray Bharane
Dattatray Bharane sarkarnama

निमगाव केतकी (जि. पुणे) : इंदापूर तालुक्याचे राजकारण हे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्याभोवती फिरत असते. काँटे की टक्कर असलेल्या इंदापुरात एखादा कार्यकर्ताही महत्वाचा ठरतो. तालुक्यातील पिटकेश्वरच्या सरपंच आणि सोसायटीच्या माजी अध्यक्षांसह सदस्यांनी भाजपला अर्थात माजी मंत्री पाटील गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. (BJP's Pitkeshwar sarpanch joins NCP)

दरम्यान, सरपंच आणि सोसायटीच्या माजी अध्यक्षांनी हर्षवर्धन पाटील गटाची साथ सोडल्याने त्यांना धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षबदला महत्वाचा मानला जात आहे.

Dattatray Bharane
‘नथुराम’ अमोल कोल्हेंना पश्चाताप; गाठला इंद्रायणी घाट!

पिटकेश्वर गावच्या विद्यमान सरपंच सुनीता हनुमंत भोसले आणि पिटकेश्वर सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी किरकत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. दत्तात्रेय भरणे यांनी सर्वांचे स्वागत करत पिटकेश्वरला विकास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

Dattatray Bharane
मी आणि फडणवीस कमळासाठी आग्रही होतो; पण मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील कार्यक्रमात अरुण दत्तात्रेय पवार, प्रेमचंद यादव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल बाळासाहेब किरकत, अजित मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी माजी उपसरपंच संजय कांबळे, माजी उपसरपंच अंकुश मस्के, प्रवीण भिसे, माजी सरपंच शंकर भिसे, कॉन्ट्रॅक्टर दैवत पवार, अमोल भोंग, भारत कांबळे, दत्तात्रेय जाधव, अनिल कांबळे, लखन जाधव, रणजीत येरळकर, हनुमंत भोसले हे उपस्थित होते.

Dattatray Bharane
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सरपंच भोसले म्हणाल्या की, आम्ही आगामी काळात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याच मार्गदर्शनाखाली गावात भरीव विकास कामे करु. यापुढची वाटचाल त्यांच्या सूचनेनुसार होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com