पुणे : सोलापूर जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. कॉंग्रेसबरोबरच आघाडी करत लढलेल्या माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या आघाडीला भोपळादेखील फोडता आला नाही. तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या भाजपाच्या पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकर (Niranjan Bhumkar) यांनी जोरदार मुसंडी मारत तालुक्यातील दोन दिग्गचांना धूळ चारली आहे.
वैराग नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली.१७ जागांपैकी १३ जागा एकहाती मिळवत राष्ट्रवादीने नगरपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत नगरपंचायतीसाठी बार्शीचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊतांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती.आमदार राऊत यांना फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.बार्शीचे माजी आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेना व कॉंग्रेस अशी आघाडी करून ही निवडणूक लढविली. मात्र, सोपल यांच्या या आघाडीला एकही जागा मिळविता आली नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांनी एकहाती लढत देत राऊत व सोपल या दोन्ही दिग्गजांना धूळ चारली आहे.या निवडणुकीत वैरागच्या जनतेने पैसा हरवला आणि स्वाभिमान जिंकून दिला,अशी प्रतिक्रिया भूमकरांनी व्यक्त केली आहे.या तालुक्यात अनेक वर्षांपासून दिलीप सोपल व त्यानंतर राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व होते. मात्र,वैराग नगरपरिषदेच्या निवडणुकीत
जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.या तालुक्यातील महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीवर मोहिते-पाटील समर्थक असलेल्या दोन गटांच्या हाती सत्ता विभागली जाण्याची शक्यता आहे. एका गटाला पाच तर दुसऱ्या गटाला चार जागा मिळाल्या आहेत.भाजपाच्या पॅनेलला केवळ एक जागा मिळाली आहे.मोहिते-पाटील यांचे दोन गट व भारतीय जनता पार्टीचे पॅनेल अशी समोरासमोर लढत झाली. मोहिते-पाटील यांच्या दोन गटाला मिळून नऊ तर भाजपाला एक अशी येथील स्थिती आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहा तर कॉंग्रेसला एक जागा मिळाली आहे.भाजपाच्या विरोधात आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून येथील सत्ता मोहिते-पाटील यांनी राखली आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.