Bhalke Politic's : पंढरपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भगीरथ भालकेंच्या वहिनींची झेडपी निवडणुकीतून माघार

Zilla Parishad Election 2026 : रूपाली भालके यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याने पंढरपूरच्या गोपाळपूर गटात राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपसमोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने ही निवडणूक तुलनेने सोपी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Solapur ZP
Solapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 25 January : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात नाव ट्विस्ट आला असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या वहिनी रूपाली भालके जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे भाजपसमोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने पक्षाला गोपाळपूर गटाची निवडणूक तुलनेने सोपी जाण्याची चिन्हे आहेत. भालके यांनी कोणत्या कारणासाठी ही माघार घेतली, याची चर्चा आता तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २७ जानेवारी ही अंतिम मुदत आहे, त्याला आणखी दोन दिवस असतानाच पंढरपूर (Pandharpur) तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके यांच्या पत्नी रूपाली भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला होता.

निवडणुकीतून माघार घेतली आहे. रूपाली भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटातील भाजप (BJP) विरोधातील लढाई आता जवळपास संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निमित्ताने पंढरपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.

गोपाळपूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला होता. त्यामुळे भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यांच्या पत्नी दुर्गा अंकुशराव यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भगीरथ भालके यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके यांच्या पत्नी रूपाली भालके, राष्ट्रवादीचे नेते हणमंत पवार यांच्या पत्नी सुनंदा पवार यांच्यासह १२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते.

Solapur ZP
Vishwajit Barne : पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा गटनेता ठरला! विश्वजित बारणे यांची एकमताने निवड; शिवसेनेत दबक्या आवाजात चर्चा..

दरम्यान, रूपाली भालके यांच्यासह भाग्यश्री अंकुशराव, स्वाती लेंगरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. विशेषतः भालके यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यात भाजपच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे केले होते.

नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकण्याचे काम भालके यांनी केले आहे. नगरपालिकेपाठोपाठ भगीरथ भालकेंनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूकही भाजपच्या विरोधात जोरदारपणे लढविण्याची तयारी केली होती. मात्र, भालके यांनीच माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, भगीरथ भालके यांचे बंधू व्यंकट भालके कासेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या पत्नी रुपाली भालके ह्या गोपाळपूर गटातून उभ्या होत्या. मात्र, त्यांनीच माघार घेतल्याने पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. व्यंकट भालकेही आता निवडणूक लढविणार की तेही माघार घेणार, याविषयी चर्चेला उधाण आले आहे.

Solapur ZP
Prithviraj Chavan ON CM Fadnavis : 'फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका योग्य नाही पण...', काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने मांडली रोखठोक भूमिका

भाजपच्या बिनविरोधची चर्चा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी (ता. २७) शेवटचा दिवस आहे. या दिवशी अन्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर भाजपच्या उमेदवार दुर्गा अंकुशराव यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवली जाऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com