नीलेश लंकेंनी औटींना संधीच दिली नाही : पारनेरमध्ये बहुमतचा आकडा गाठलाच

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी आज दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवत राष्ट्रवादीला बहुमत मिळवून दिले.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

अहमदनगर - पारनेर नगर पंचायत निवडणुकीचा निकाल काल ( बुधवारी ) लागला. यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP ) सर्वाधिक 7 जागा मिळविता आल्या त्यांना सत्तेसाठी दोन नगरसेवक आवश्यक होते. आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी आज दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवत राष्ट्रवादीला बहुमत मिळवून दिले. आमदार लंके यांनी या 9 नगरसेवकांची आज गट नोंदणीही करून घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. Nilesh Lanka did not give a chance to Auti: Parner reached majority

आमदार लंके यांनी या 9 नगरसेवकांना अहमदनगरमधील राष्ट्रवादी भवना आणले. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दोन अपक्ष नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यानंतर पत्रकार परिषदही झाली.

Nilesh Lanke
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

पत्रकार परिषदेत राजेंद्र फाळके म्हणाले, पारनेर नगर पंचायत निवडणुकीनंतर प्रथम दर्शनी वाटले की त्रिशंकू स्थिती आहे. 17 नगरसेवकांपैकी सात नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आले. आज दोन अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नऊ जणांची गट नोंदणी आज करून राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा पार केला आहे. पारनेर नगर पंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल. या नगरसेवक संख्येत आणखीही वाढ होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, पारनेर विधानसभा मतदार संघात जसा 2019ला चमत्कार झाला. एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला प्रतिनिधीत्व करण्याची लोकांनी संधी दिली. त्या लोक प्रतिनिधीचे या शहरातील व मतदार संघातील कामाला जनतेने या निवडणुकीतून दिलेली ही पावती आहे. निश्चितच राज्यातील पारनेर हा महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके हे महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील मान्यता प्राप्त नेतृत्त्व उदयाला येत आहे. निश्चितच पक्ष व पक्ष नेतृत्त्व त्यांना भविष्यकाळाच चांगली संधी देईल. एका बलाढ्य शक्ती विरूद्य त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला एका सामान्य कुटुंबातील तरुण महिलेने पराभूत करणे हा विजय खरेतर आमदार नीलेश लंके यांचा आहे. हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविणारा ठरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nilesh Lanke
नीलेश लंके म्हणाले, ते विद्यार्थी कोरोनामुक्त होईपर्यंत मी त्यांचा पालक...

नीलेश लंके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरील जरी आमचे काल 7 नगरसेवक निवडून आले आहेत. तरी प्रत्येक प्रभागात चार जण राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होते. काही ठिकाणी आम्ही इच्छुकांना थांबवू शकलो नाही. त्यातीलच एक आमच्या सुरेखा भालेकर आणि भुषण शेलार यांनी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविली. ते विजयी झाले. ते आता स्वगृही आले आहेत. अजूनही काही नगरसेवक संपर्कात आहेत. त्यामुळे सध्या जरी आमची संख्या 9 नगरसेवकांची दिसत असली तरी आगामी दोन दिवसांत ही संख्या वाढणार आहे.

ते पुढे म्हणाले, पारनेर शहर विकास आघाडीही निवडणुकी पुरती तयार केली होती. आपल्याला काही तरी अजेंडा घेऊन जायचा म्हणून आपण ही आघाडी तयार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पारनेर शहर विकास आघाडी याच्यात काहीही फरक नाही. आम्ही कालही एकत्र होतो. आजही एकत्र आहोत. निवडणुकीचा निकाल लागल्यावर आम्ही दहाव्या मिनिटाला एकत्र होतो. त्यामुळे आम्ही सगळे एकच आहोत.

Nilesh Lanke
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

म्हणून नगरसेवक घेऊन फाळकेंकडे आलो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. माझ्या प्रत्येक निवडणुकीत मला जी मोलाची साथ दिली ती राजेंद्र फाळके यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मला तिकीट देऊन माझ्या प्रत्येक निर्णयात ते सहभागी होते. नगर पंचायत निवडणुकीत ते स्वतः ए बी फॉर्म घेऊन आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही नगरपंचायत निवडणुकीसाठी सभा घेतली. आमच्या या विजयात राजेंद्र फाळके व हसन मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक घेऊन मी राजेंद्र फाळके यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे आमदार लंके यांनी सांगितले.

विजय औटी राष्ट्रवादीचे गटनेते

पारनेर नगर पंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक व राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दोन नगरसेवकांचे मिळून 9 नगरसेवकांचा एक गटाची आज गट नोंदणी करण्यात आली. या गटाचे नेते म्हणून विजय सदाशिव औटी तर उपगटनेते पदी सुरेखा अर्जुन भालेकर यांची नियुक्ती केल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com