नीलेश लंके म्हणाले, ते विद्यार्थी कोरोनामुक्त होईपर्यंत मी त्यांचा पालक...

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी काल ( सोमवारी ) रात्री उशिरा कोरोना बाधितांची भेट घेतली तसेच विद्यालयाची पाहणी केली.
MLA Nilesh Lanke visited the students who were suffering from corona

MLA Nilesh Lanke visited the students who were suffering from corona

Sarkarnama

Published on
Updated on

टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे असलेल्या केंद्रीय जवाहर नवोद्य विद्यालयात चार दिवसांत 82 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या कोरोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी काल ( सोमवारी ) रात्री उशिरा कोरोना बाधितांची भेट घेतली तसेच विद्यालयाची पाहणी केली. Nilesh Lanke said, "Until that student is released from coronation, I will be his parent ...

जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत. तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे असा आधार देत कोरोना बाधित असणाऱ्या विद्यार्थ्यांची आमदार निलेश लंके यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेत या सर्वांना आधार दिला आहे.

<div class="paragraphs"><p>MLA Nilesh Lanke visited the students who were suffering from corona</p></div>
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

पारनेर तालुक्यातील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात गेल्या आठवड्यापासुन कोरोना बाधित मुले आढळून येत ही संख्या आता 82 वर गेली आहे. ही सर्व मुले पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमदार लंके हे या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत. काल सायंकाळी उशीरा त्यांनी या सर्व उपचार घेत असलेल्या मुलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली व मी तुमचा पालक आहे तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास मला सांगा असा आधार मुलांना दिला.

<div class="paragraphs"><p>MLA Nilesh Lanke visited the students who were suffering from corona</p></div>
नीलेश लंके म्हणाले, `युवक राजकारणात आले तरच राजकारणाची सुधारणा`

आमदार लंके यांनी मुलांचे मनोबल वाढविले. ते म्हणाले, पालक व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल, सर्वोत्तम उपचार केले जातील. जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे व या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान संस्थे मार्फत मोफत केला जाईल. प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत.

नवोदय विद्यालयात 70 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.याच विद्यालयातील आणखी 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.विद्यालयातील बाधितांचा आकडा आता 82 वर गेला आहे. अजून आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com