
Nagpur News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. वाढीव मतांबाबत शंका व्यक्त केली जात आहे. न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. यावर राज्याचे मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच सुनावले. ज्या आमदार, खासदारांना ईव्हीएमर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी आधी राजीनामे द्यावे आणि बॅलेटवर निवडून येऊन दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) राज्यात मोठा विजय मिळाला होता. त्यामुळे विधानसभेतील मोठे यश मिळेल आणि महाविकास आघाडी सत्तेवर येईल, अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होती. मात्र, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे फक्त १६ आमदार निवडून आले. त्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे.
निवडणुकीच्या निकालावर अद्यापही त्यांचा विश्वास बसत नाही. निकालाच्या विरोधात पराभूत झालेल्या सुमारे शंभर उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुद्धा लोकसभेत वाढीव मतदार आले कुठून याची माहिती देण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर ही मते शोधून काढण्यासाठी काँग्रेसने ईगल समिती स्थापन केली आहे.
यावर बोलताना राणे म्हणाले, आयोगाच्या कारभारवर व ईव्हीएमवर एवढीच शंका असेल तर काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांनी खासदारांनी आधी राजीनामे द्यावे आणि बॅलेटवर निवडून येऊन दाखवावे. त्यानंतर त्यांना त्यांची जागा कळेल ते आजी राहातात की माजी. महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वाच्या नावाने निवडून आले यांचे दुःख काँग्रेसला आहे.
मालेगावमध्ये एकाच मतदारसंघात एक गठ्ठा मतदान काँग्रेसला पडले. त्यांचा खासदार निवडून आला. आम्ही त्यावर आक्षेप घेतला नाही आणि शेंबड्यांसारखं रडत बसलो नाही. आम्ही कामाला लागलो. मेहनत घेतल्यान हरियाणा व महाराष्ट्रमध्ये सत्ता आणून दाखवली. आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला. स्वतः ईव्हीएमवर निवडून यायचे आणि मग रडत बसणे काँग्रेसने बंद करावे. त्यापेक्षा लोकांची काम करा, असा सल्लाही राणे यांनी काँग्रेसला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.