Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात धुरळा उडणार, शरद पवार शशिकांत शिंदेंसाठी, तर फडणवीस उदयनराजेंसाठी मैदानात

Satara Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता संपणार आहे.
devendra fadnavis sharad pawar
devendra fadnavis sharad pawarsarkarnama

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघात ( Satara Lok Sabha Constituency ) महायुती व महाविकास आघाडीच्या सांगता सभांच्या तोफा आज (शनिवारी) सातारा शहरात धडाडणार आहेत. महाविकास आघाडीची सांगता सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तर, महायुतीची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तालिम संघाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. दोन्ही सभांची वेळ एकच असल्याने कोणाचे शक्ती प्रदर्शन मोठे होणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.

सातारा लोकसभेत महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) अशी चुरशीची लढत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत पवारांच्या तीन तर मोदींची एक सभा या मतदारसंघात झालेली आहे. त्यामुळे येथे मोदी व शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीची सांगता सभा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी जयंत पाटील, फौजिया खान, संजय सिंह, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर, दुसरीकडे साताऱ्यातील तालिम संघाच्या मैदानावर महायुतीची सांगता सभा आजच सायंकाळी पाच वाजता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दोन्ही सभा एकाच वेळेला असल्याने साताऱ्यात महायुती व महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सकाळी 11 वाजता येथील महात्मा फुले मंडईत खासदार उदयनराजेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या सभेला आमदार मकरंद पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जाहीर सभा पाटणला दुपारी दोन वाजता बाजार समिती मैदानावर होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी (ता. 5) सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा महत्वाचा असल्याने महायुती व महाविकास आघाडीनं आपली ताकत दाखविण्यासाठी सांगता सभा साताऱ्यात घेतल्या आहेत. त्यामुळे साताऱ्यातील सांगता सभांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com