महादेवराव महाडिकांच्या राजकारणाची सुरुवात झालेल्या संस्थेत गटबाजी : अध्यक्षांचा राजीनामा

ही संस्था सुमारे ८० वर्षांपूर्वीची असून सर्वात जुनी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते.
mahadevrao mahadik
mahadevrao mahadikSarkarnama
Published on
Updated on

शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) : माजी आमदार महादेवराव महाडिक गटातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून निवास कदम यांनी शिरोली विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष व संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांच्या राजीनाम्यामुळे महाडिक गटातील कलह चव्हाट्यावर आला आहे. महाडिक गटाचे नेते यावर आता कोणता निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे. (Niwas Kadam, President of Shiroli Vikas Seva Society resigns)

शिरोली विकास सेवा सहकारी संस्था ही सुमारे ८० वर्षांपूर्वीची असून परिसरातील सर्वात जुनी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाची सुरूवात याच संस्थेतून झालेली आहे. त्यामुळे शिरोलीच्या राजकारण आणि सहकार क्षेत्रात या संस्थेला विशेष महत्त्व आहे. या संस्थेवर आजपर्यंत कायम महाडिक गटाची सत्ता राहिलेली आहे.

mahadevrao mahadik
अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याची धुरा सोपवली दोन वर्गमित्रांवर!

शिरोली विकास सेवा सहकारी संस्थेत निवास कदम हे गेल्या तीस वर्षांपासून संचालकपदावर काम करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली होती. निवास कदम यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संगणकीकृत झाली आहे. संस्थेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण करून, त्यासाठी पाणीपट्टीचा कोणताही अतिरिक्त बोजा सभासदावर पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे. तसेच, उत्कृष्ट व्यवस्थापन, पारदर्शक कारभार, वसुली या निकषांवर कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने एक लाख रुपयांचे अनुदान व पुरस्कार संस्थेने मिळविला आहे. तरीही संस्थेच्या कारभारात कदम यांना महाडिक गटाच्या इतर संचालकांमधून गेल्या काही महिन्यांपासून विरोध होत आहे. या अंतर्गत कुरघोडीतून होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच कदम यांनी थेट टोकाची भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्ष व संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

mahadevrao mahadik
अरे वेड्या, भाजपला गाडण्याची वल्गना करण्यापेक्षा आधी तुझं नाचगाणं बंद कर : फडणवीसांचा मुंडेंना टोला

यासंदर्भात शिरोली विकास सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष निवास कदम म्हणाले की, संस्थेतील गटातंर्गत राजकारणाला कंटाळून संस्थेच्या अध्यक्ष व संचालक पदाचा राजीनामा मी दिला आहे. मी संस्थेचा राजीनामा दिला असला तरी यापुढेही माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्याच नेतृत्वाखाली महाडिक गटासाठी काम करत राहीन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com