Satara SP : माझ्या स्वागतासाठी बुके नको, पुस्तके आणा ; समीर शेख यांचा अनोखा उपक्रम!

Satara SP : शेख यांच्या आवाहनानंतर त्यांच्या या अनोख्या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे.
Sameer Shaikh
Sameer ShaikhSarkarnama

Satara SP : जिल्ह्यात नुकतेच बदली होऊन आलेले सातारचे नवे पोलिस अधीक्षक समीर शेख आज (२२ ऑक्टो ) पदभार स्वीकारणार आहेत. पदग्रहणानंतर आपल्या स्वागतासाठी येणाऱ्या, भेटायला येणाऱ्या नागरिकांनी बुके ऐवजी गडचिरोली येथील युवकांसाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सातारचे आधीचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या बदलीचे काल शासनाने आदेश दिले. बन्सल यांच्या जागी समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते गडचिरोली येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. नवीन अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक जण भेटायला येत असतात. त्या वेळी ते बुके आणत असतात; परंतु नागरिकांनी बुकेऐवजी नवीन आवृत्तीची पुस्तके भेट द्यावीत, असे त्यांनी म्हंंटले आहे.

Sameer Shaikh
Satara : भाजपने केला शिवराज पाटलांचा निषेध; प्रतिमेस मारले जोडे

शेख यांच्या आवाहनानंतर त्यांच्या या अनोख्या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे. दरम्यान बन्सल यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले होते. गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

Sameer Shaikh
Satara SP : समीर शेख साताऱ्याचे नवे एसपी; बन्सल नियुक्तीच्या प्रतिक्षेत!

यापूर्वीही सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा एकदा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली आहे. गडचिरोलीवरून पुन्हा समीर शेख हे साताऱ्यात एस. पी. म्हणून आले आहेत. आज ते कार्यभार स्वीकारणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com