Satara SP : समीर शेख साताऱ्याचे नवे एसपी; बन्सल नियुक्तीच्या प्रतिक्षेत!

Satara SP : सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली.
Sameer Shaikh
Sameer ShaikhSarkarnama

Satara SP : गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (Sameer Shaikh) यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा एकदा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली आहे. सध्याचे एसपी अजय कुमार बन्सल नियुक्तीचा प्रतीक्षेत आहेत. (Latest Marathi News)

गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले होते. यामध्ये अजय कुमार बन्सल यांची बदली प्रस्तावित ठेवण्यात आली असून गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक यांना साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रात्री उशीरा पोलीस मुख्यालयांत या बदलीचे आदेश प्राप्त झाले अजय कुमार बन्सल यांनी सात ऑक्टोबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडीपार केले होते .

Sameer Shaikh
Satara : लोकसभेप्रमाणे सातारा पालिकेतही उदयनराजेंना नारळ द्या... शिवेंद्रसिंहराजे

तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगात पाठवले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांच्याच कार्य काळामध्ये डिपीडिसीतून तब्बल 105 वाहनांसाठी पोलिसांना निधी मिळाला आणि ती वाहने तपास कामासाठी पोलिसांना उपलब्ध झाली महिला सुरक्षा प्रदर्शित प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याचे हस्ते झालेले उद्घाटन चर्चेचा विषय ठरले.

Sameer Shaikh
सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी... शेखर गोरे

हा प्रकल्प सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजला गेला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा पोलिसांनी 75 किलोमीटरची धाव घेतली यामध्ये सुद्धा बन्सल यांचे मोठे नियोजन होते. बन्सल यांनी 56, 57 च्या प्रस्तावद्वारे 91 जणांना तडीपार केले बंसल यांच्या कार्यकाळात एलसीबीने संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई केली 18 खुनाचे गुन्हे उघडकिस जाणून 54 आरोपींना अटक केली. नऊ दरोड्याची प्रकरणे यशस्वीरित्या तपासून यामध्ये 46 जणांना अटक केली होती.

रात्री उशीरा बन्सल यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले. मात्र सध्या त्यांची बदली प्रस्तावित ठेवण्यात आली आहे. गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे समीर शेख यांनी साताऱ्यात उपअधीक्षक म्हणून पदभार 2018 मध्ये स्वीकारला होता.साधारण 17 महिने त्यांनी साताऱ्यात धडक कामगिरी केली आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्य ग्रंथालय तयार करून आपल्यातील अनोख्या कार्यशैलीचा परिचय करून दिला होता.

Sameer Shaikh
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

शाहूपुरी सातारा शहर येथील मटका आणि जुगार अड्ड्यांवर दणकट कारवाया करत गुन्हेगारांमध्ये समीर शेख यांनी चांगली दहशत निर्माण केली होती. सुरूची राडा प्रकरणाचा तपास समीर शेख यांनी केला होता. शंभर हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता.

गडचिरोली वरून अजय कुमार बन्सल यांची साताऱ्यात बदली झाली होती.त्याच पद्धतीने गडचिरोलीवरून पुन्हा समीर शेख हे साताऱ्यात एस पी म्हणून आले आहेत. लवकरच ते कार्यभार स्वीकारणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com