Bogus voters Issue : कऱ्हाड दक्षिणमधील ‘त्या’ 11बोगस मतदारांबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 25 तारखेपर्यंत सोक्षमोक्ष लावणार

Karad South Assembly constituency : कापील येथील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गणेश पवार हे 14 ऑगस्टपासून कराड येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
Bogus voters Issue
Bogus voters IssueSarkarnama
Published on
Updated on

Karad, 19 August : विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात कापील आणि गोळेश्वर या ठिकाणी बोगस मतदान झाले आहे. त्याविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी कराड तहसील कार्यालयासमोर गणेश पवार हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करत आहेत. दरम्यान, कापील येथे नोंदविण्यात आलेल्या बोगस मतदान नोंदणी प्रकरणी मतदारसंघाबाहेरील नोंदणी केलेल्या 11 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिले आहे.

कापील येथील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गणेश पवार हे 14 ऑगस्टपासून कराड (Karad) येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. पवार यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कराड येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी आज पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सकाळी आठच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. पवार यांच्याशी त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आहे. पवार यांची हरकत असलेल्या 11लोकांना नोटीस पाठविण्याचे आश्वासन प्रांतधिकारी म्हेत्रे यांनी दिले आहे.

या नोटिसा पाठविण्यात आलेल्या 11हरकतींवर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी करून निकाल देण्यात येईल, असेही प्रातांधिकारी म्हेत्रे यांनी सांगितले आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, पवार यांनी आपल्या उपोषणाबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

Bogus voters Issue
Sharad Pawar Politic's : ‘मी त्या सभेचा साक्षीदार; वसंतदादांनी तेव्हा शरद पवारांना फक्त मुख्यमंत्रीच केलं नाही तर ‘हा’ आशीर्वादही दिला...’

वेगवेगळ्या संघटना, पक्षांचा गणेश पवार यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. आज सकाळीच कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेवून त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना, भीमशक्ती संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.

Bogus voters Issue
Solapur DCC Bank Case : तीन माजी आमदारांसह नऊ बड्या नेत्यांना सहकार मंत्र्यांची नोटीस; उद्याच्या सुनावणीसाठी हजार राहण्याची सूचना

गणेश पवार यांचा आक्षेप असलेल्या कापील येथील बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. बोगस नोंदणीस जबाबदार असणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, या गणेश पवार यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात यावे, असे निवेदन सुशिक्षित बेरोजगार संघटनेने तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com