OBC Rally News : ओबीसी मेळाव्याचे होर्डिंग्ज फाडले-उखडवले; नेत्यांकडून संयम पण...

Ahmednagar Political News : वेळप्रसंगी समाजकंटकांना उत्तर देण्याची धमक; ओबीसी नेत्यांची जशास तसे उत्तर...
Ahmednagar Political News | OBC Rally News
Ahmednagar Political News | OBC Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : ओबीसी समाजाचा उद्या (ता. ३ जाने) नगर शहरात एल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याची शहरात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात फलकबाजी स्थानिक ओबीसी नेत्यांकडून होत आहे. परंतु काही समाजकंटकांकडून हे फलक टार्गेट केले जात आहेत. या घटनेवर नगर शहरातील स्थानिक ओबीसी नेत्यांनी संयम दाखवला आहे, तर ग्रामीण भागातील नेते- पदाधिकारी आक्रमक झालेले दिसून येत आहे. (Latest Marthi News)

Ahmednagar Political News | OBC Rally News
Lok Sabha Election 2024 : 'नगर जिल्ह्यातही 'रामराज्य' येणार...'; राम शिंदे अन् लंकेंनी वाढवली सुजय विखेंची धडधड

नगर शहरातील अनेक भागात ओबीसी एल्गार मेळाव्याची माहिती देणारे फलक लागले आहेत. या फलकांवर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र मोठे आहे, तर इतर नेत्यांची लहान आकारात छायाचित्र आहे. या फलकांना काही समाजकंटाकांकडून टार्गेट केले जात आहे. नगर शहरातील काही भागातील फलक फाडले गेले. यात मंत्री छगन भुजबळ यांच्या छायाचित्राला टार्गेट केले आहे. काही ठिकाणी फलक उखडून फेकून देण्यात आले. परंतु नगर शहरातील ओबीसी नेत्यांनी संयम दाखवत फाडलेल्या फलकांच्या जागी नवीन फलक आणून लावले. फाडलेल्या फलकांच्या तक्रारीत न पडता मेळाव्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार स्थानिक नेत्यांनी केला आहे. (Ahmednagar OBC Rally News)

Ahmednagar Political News | OBC Rally News
Nagar Ncp Melava:'...आता अजितदादांना मुख्यमंत्री करू', विखे-पाटील गट सावध!

दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव एल्गार मेळाव्याचे लावलेले फलक फाडल्याने, तेथे स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. फलक फाडल्याच्या निषेधासाठी स्थानिक नेत्यांनी प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला. रमेश गोरे, अरविंद सोनटक्के, किसन आव्हाड, भोरू म्हस्के, कल्पजीत डोईफोडे आदी यावेळी उपस्थित होते. 'एकच पर्व ओबीसी सर्व!' 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं..' 'आपल्या मुलांच्या भविष्यासाठी.. एक दिवस ओबीसीसाठी', अशा घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत संतप्त झाले होते.

वेळप्रसंगी उत्तर देण्याची धमक -

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आम्ही शांततेच्या मार्गाने राज्यघटनेच्या अवलंब करून आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत. अशा पद्धतीने बॅनर फाडून समाजकंटकांनी आमच्यावर एकप्रकारे हल्ला करून, आम्हाला एकत्र आणण्यासाठी भाग पाडले आहे. बॅनर फाडून विध्वंसक लोकांना दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही दुर्बल आहोत, असे नाही. तर येणाऱ्या काळात वेळप्रसंगी आम्ही जशास तसे तुम्हाला उत्तर देऊ, असा इशारा यावेळी दिलीप खेडकर यांनी दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com