Khatav Strike News: 'एकच निर्धार पाणी मिळाल्याशिवाय नाही माघार'... वेटणे, रणसिंगवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

K. M. Nalawade News: के. एम. नलवडे म्हणाले, आमच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. नैसर्गिक स्राेताचे पाणीही आम्ही घालवून बसलो तर येणारी भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही.
Vetne, Ranshingwadi Andolan
Vetne, Ranshingwadi Andolansarkarnama

-केशव कचरे

Khatav Political News: 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, 'आज नाही तर कधीच नाही', 'एकच निर्धार पाणी मिळाल्याशिवाय नाही माघार' अशा घोषणा देत खटाव तालुक्यातील वेटणे व रणसिंगवाडी येथील सुमारे तीनशे महिला, पुरुष आज सकाळी साडेदहा वाजता वेटणे येथील शॅाप्टजवळ एकत्र आले व त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

जिहे-कठापूर योजनेच्या (Jihe-katapur Yojana) आंधळी बोगद्यामुळे वेटणे आणि रणसिंगवाडी येथील 700 हेक्टरहून जास्त क्षेत्राचे भविष्यात वाळवंट होणार असून, ही बाब गेली पंधरा वर्षे रास्ता रोको, उपोषणे व आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करीत आहेत. केवळ फसवी आश्वासने देण्यापलीकडे प्रशासनाने (Satara collector) काहीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे नाईलाजास्त आम्हाला बेमुदत उपोषणाचा मार्ग चोखाळावा लागला आहे.

के. एम. नलवडे म्हणाले, आमच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. आमच्या हक्काच्या नैसर्गिक स्राेतांचे पाणीही आम्ही घालवून बसलो तर येणारी भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग चोखाळावा लागला आहे.

आमच्या दोन गावांसाठी 0.13 टीएमसी पाणी आरक्षित करावे, बोगध्यामध्ये गेट बसवून सोलर पंपाच्या साह्याने दोन्ही गावांतील पाझर तलाव, बंधारे, ग्रामतळी कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने भरावित, रणसिंगवाडी-वेटणे हद्दीतील बोगद्यात वर्षभर पाणी साठवून ठेवावे. अशा आमच्या न्याय मागण्या असून, या मागण्यांची पूर्तता दाेन आक्टोबरपूर्वी न झाल्यास वेटणे आणि रणसिंगवाडी येथील 24 ग्रामस्थ दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी आत्मदहन करतील.

दरम्यान, १७ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत जमाव व शस्त्रबंदी आदेश असल्याने आंदोलन काळात जर कोणताही अनुचित प्रकार, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी सहकार्य करावे; अन्यथा पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करणार असल्याचा इशारा व लेखी सूचना पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी संबंधितांना दिला आहे.

या वेळी विक्रम विजय नलवडे, संजय रघुनाथ नलवडे, रामचंद्र कृष्णा नलवडे, संदीप रामचंद्र नलवडे, अजित नारायण नलवडे, प्रताप वामन नलवडे, पोपट राजाराम नलवडे, सोपान बापू गुंजवटे, अनिल जगन्नाथ रणसिंग, अविनाश दादासो रणसिंग, सोमनाथ प्रल्हाद फडतरे हे बेमुदत उपोषणास बसले आहेत.

Edited By Umesh Bambare

Vetne, Ranshingwadi Andolan
Satara Political News : आमदार अपात्रता प्रकरणात जाणूनबुजून चालढकल : शशिकांत शिंदेंचा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com