Rohit Pawar | Prajakta Tanpure
Rohit Pawar | Prajakta Tanpure Sarkarnama

Big responsibility to Rohit Pawar : शरद पवारांचे एक पाऊल पुढे; रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना मोठी जबाबदारी

NCP Politics : रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोन्ही आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटातील असल्याने विश्वासू आहेत.
Published on

Nagar Politics : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दोन दिवसांपूर्वीच आपले प्रभारी विविध जिल्ह्यांत नियुक्त करून त्यांना तेथील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. अजित पवार गटापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानेही राज्यातील विविध जिल्ह्यांत आपल्या गटातील आमदारांची विविध जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यात शरद पवारांचे नातू आ.रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आ.प्राजक्त तनपुरे यांच्याकडे महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

आ.रोहित पवारांकडे कोकणातील रायगड तर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे आणि मुलगी मंत्री अदिती तटकरे रायगड जिल्ह्यातून येतात. या पार्श्वभूमीवर कधीकाळी शरद पवारांचे विश्वासू असलेल्या तटकरे यांच्या जिल्ह्याची आ. रोहित पवारांकडे दिलेली जबाबदारी आहे. त्यामुळे सध्या आक्रमक पवित्र्यात असलेले रोहित पवार तटकरेंविरोधात रान पेटवतील, असे बोलले जात आहे. याच बरोबर आ.रोहित यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी असेल.

Rohit Pawar | Prajakta Tanpure
Sana Khan Murder Case : आणखी एकाला अटक, मोबाईलमध्ये नागपुरातील बड्या असामींचे 'व्हिडिओज'?

जयंत पाटलांचे भाचे आणि राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे यांच्याकडेही नगर आणि नाशिक या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यांसाठी प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 2019 ला नगर आणि नाशिक जिल्ह्यांत मिळून जवळपास बारा आमदार राष्ट्रवादीचे आहेत. यात नगर जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार अजित पवार गटाकडे गेल्याने तर नाशिकमध्येही हीच परस्थिती असल्याने आ. प्राजक्त तनपुरे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोन्ही आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटातील असल्याने विश्वासू आहेत. अजित पवार गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पुन्हा राजकीय चढाई करून हे गड 2024 ला शरद पवारांच्या अधिपत्याखाली आणण्याची मोठी जबाबदारी युवा आ.रोहित आणि आ.प्राजक्त यांच्यावर असणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com