BJP Politics : कोकणात महायुतीत पक्ष वाढीची स्पर्धा; भाजपचा मास्टर स्ट्रोक, कुडाळ येथे उद्या भाजपचा मेळावा

Maharashtra Politics : कोकणात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये पक्ष वाढीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. सध्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे.
BJP Politics
BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : कोकणात सध्याच्या घडीला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजप एके भाजप या तत्वावर सदस्य नोंदणी केली जातेय. जानेवारीत झालेल्या सदस्य नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ऑपरेशन टायगर आणि आता ऑपरेशन शिवधनुष्य राबवत आहे. यातून ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. पण याआधीच भाजपने येथे मास्टर स्ट्रोक खेळत आपल्याच मित्र पक्षाला शह दिला आहे. भाजप उद्या (ता.12) येथे मेळावा घेत असून यात विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

भाजप कुडाळ तालुक्यातील ओरोस भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर भव्य मेळावा घेणार आहे. यासाठी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे आणि खासदार नारायण राणे यावेळी उपस्थित राहणार असून विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी दिली.

देशातील नागरिकांनी आता हिंदुत्व आणि राष्ट्रीय आत्मियतेला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत तिसऱ्या वेळी सत्ता दिली. सिंधुदुर्गात प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक होवून नारायण राणे विजयी झाले. त्यानंतर कोकणात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही विधान परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून आले. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आल्याचे देसाई यांनी म्हटलं आहे.

BJP Politics
karnataka BJP : पत्नीच्या नावे गाळे घेणे भाजपच्या नगरसेवकांना भोवले; सदस्यत्वच प्रादेशिक आयुक्तांकडून रद्द

भाजपने राबविलेल्या पक्ष सदस्य नोंदणीत ग्रामीण भागात सर्वाधिक नोंदणी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सत्कार केला. या सर्व यशानंतर आता प्रत्येक तालुक्यात पक्षाचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे उद्या कुडाळ तालुक्यात पक्षाचा मेळावा होणार असून तालुक्यातील भाजपची ताकद दाखवू, असेही त्यांनी म्हटलं आहे.

BJP Politics
BJP Politics : मोदी-शहांची कुटनीती फसली, पहिल्यांदाच ओढवली नामुष्की!

महायुतीत फोडाफोडी नाही : सावंत

या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असून विरोधी पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. पण विरोधी पक्षातील चांगले चेहऱ्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल. पण महायुतीतील कार्यकर्त्यांनी आम्ही घेणार नाही. त्यांचा विचार महायुतीचे नेतृत्व करेल. महायुतीतील सहकारी पक्षात फोडाफोडी करणार नाही, असे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com