Satej Patil Kolhapur News : शेट्टींना काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध; कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांसमोर मांडली भूमिका

Raju Shetti Latest News : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस राजू शेट्टी यांच्यावर नाराज आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या आहेत.
Satej Patil Raju Shetti
Satej Patil Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Swabhimani Shetkari Sanghatana Loksabha : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबद्दल महाविकास आघाडीमधील विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोनदा भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. केवळ ठाकरे यांनाच शेट्टी यांच्याकडून महत्त्व दिले जात असताना आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस राजू शेट्टी यांच्यावर नाराज आहेत. केवळ महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला शेट्टी यांच्याकडून महत्त्व दिले जात असल्याने त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची गरज नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फरफट कशाला? अशा शब्दांत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या आहेत. Latest News on Maharashtra Politics

इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची भेट घेत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत Hatkanangale Loksabha Constituency आमदार पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यावा, तसेच इंडिया आघाडीची राजकीय ताकद घेऊन स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणीही या वेळी आमदार पाटील यांच्याकडे करण्यात आली.

माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघातून फक्त शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया तथा महाविकास आघाडीकडून शेट्टी यांच्या संभाव्य उमेदवारीला इचलकरंजीतून उघडपणे विरोध केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satej Patil Raju Shetti
Shivajirao Adhalrao: शिंदेंचा शिलेदार आज धनुष्यबाण टाकून हातावर घड्याळ बांधणार

इंडिया आघाडीकडून (India Alliance) जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा, असे आवाहनही केले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती. त्यामध्ये उमेदवारीबाबत सुरू असलेल्या घडामोडीचा आढावा घेतला होता, तर उमेदवारीबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी आमदार पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार त्यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सद्यःस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विद्यमान खासदारांची सद्यःस्थिती व निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची नावे याबाबत ऊहापोह करण्यात आला. इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची कितपत शक्यता यावरही या वेळी विचारमंथन करण्यात आले. शिष्टमंडळात काँग्रेसचे (Congress) प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, शिवसेनेचे सयाजी चव्हाण, महादेव गौड, संभाजी नाईक, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.

Edited By : Rashmi Mane

R

Satej Patil Raju Shetti
Raj Thackeray News : भाजपचे पापक्षालन, ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना परत ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com