Hariyana Assembly Result : हरियाणा निकालावर संशय; प्रणिती शिंदेंचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठे भाष्य

Praniti Shinde : हरियाणातील निकालाबाबत ग्राउंडपातळीवर आमचेही काही विषय असतील. त्याचं विश्लेषण पक्षाच्या व्यासपीठावर आम्हाला करावं लागेल. पण हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय येतो
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 October : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालार संशय घेत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीत अधिकाऱ्यांवर आणि ईव्हीएम मशीनवर सुपरव्हिजन करण्याचा आमचा प्लॅन असेल, असे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष (Congress) सत्तेवर येईल, असा अंदाज बहुतांश सर्वच एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र हरियाणात भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी मतमोजणी सुरू असतानाच निवडणूक आयोगावर आरोप केले होते.

दरम्यान, काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही हरियाणा विधानसभा निवडणूक आणि निकालाबाबत भाष्य केले आहे. हरियाणातील निकालाबाबत ग्राउंडपातळीवर आमचेही काही विषय असतील. त्याचं विश्लेषण पक्षाच्या व्यासपीठावर आम्हाला करावं लागेल. पण हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय येतो, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

Praniti Shinde
Subhash Deshmukh : सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला विरोध वाढला; भाजपतील नाराजांनी गाठला फडणवीसांचा बंगला

लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने सतर्कपणे काम केलं, तसंच आगामी विधानसभा निवडणुकीतही काम केले जाणार आहे. विशेषतः अधिकाऱ्यांवर आणि ईव्हीएम मशीनवर सुपरव्हिजन करण्याचा आमचा प्लॅन असेल, असेही प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

सोलापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयांचे मोल काय कळणार, असा सवाल केला होता. तसेच, प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाच देण्याचा प्रकार आहे, असाही आरोप केला होता. त्यालाही आज प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

Praniti Shinde
Rahul Gandhi : ....म्हणून राहुल गांधींच्या नव्या राजकारणाची मोदींसह मित्रपक्षांनाही भीती वाटत असेल?

लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसीमधून सहा कोटी रुपये घेण्यात आले आहेत. एसी, कुलर, पंख्यासाठी हा निधी वापरण्यात आला आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. एकीकडे प्रसूतीगृहात साधनसामग्री नाही, उमेद अभियानासाठी पैसे नाहीत. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसीतून सहा कोटी रुपये घेण्यात आले आहेत, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com